राम नामाच्या गजराने दुमदुमली कुरखेडा नगरी

166

रामनवमीनिमित्त शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, ३१ मार्च : शहरात रामनवमी निमित्याने निघालेल्या भव्यदिव्य शोभायात्रेत आमदार , कृष्णा गजबे यांनी मर्यादा पुरुषोत्तम भगवान सियारामचंद, -लक्ष्मण’ हनुमान यांचे दर्शन घेऊन कुरखेडावासीयांना दिल्या रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या. रामनवमी उत्सवानिमित्त गुरुवारी श्रीराम मंदिर कुरखेडा येथे १२ वाजता राम जन्मोत्सव साजरा करून महाप्रसादाचे वितरण करण्यात आले व सायंकाळी विश्व हिन्दू परिषद, श्रीराम मंदिर समिती व श्रीराम उत्सव समिती कुरखेडा यांच्या वतीने कुरखेडा शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.
मिरवणूकीत भगवान श्रीराम यांच्या भव्य तैलचित्रासह विविध झाकी, ढोल ताशे तसेच भगवान राम, लक्ष्मन सीता व हनुमान, घोड्यावर स्वार शिवाजी महाराज यांचा वेशभूषेतील बालके आकर्षणाचे केंद्रबिंदु ठरले होते. मिरवणूक डिजे व वाजंत्रीचा तालात नाचत गात व जय श्रीरामाचा जयघोष करीत श्रीराममंदीर, हूसैनी काम्पलेक्स, जूना बसस्थानक, बाजारपेठ, आंबेडकर चौक, मस्जीद चौक, कुंभिटोला मार्ग ते हनुमान मंदिर मार्गे साईमंदीरात पोहचत विसर्जित करण्यात आली.
मिरवणूकीत गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते, आमदार कृष्णा गजबे, विश्व हिन्दू परिषदेचे जिल्हाध्यक्ष वामनराव फाये, भाजयुमो चे जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये, भाजपा तालुका महामंत्री तथा नगरसेवक अॅड उमेश वालदे, नगरसेवक बबलू हूसैनी, नगरसेवक सागर निरंकारी, नगरसेवक रामभाऊ वैद्य अतूल झोळे, गणपत सोनकूसरे, विलास गावंडे, प्रा नागेश फाये, संस्कार क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष मनीष फायदे, श्रीराम अर्बन निधी बँक अध्यक्ष गुणवंत फाये, श्रीराम मंदिर समितीचे सचिव हंडीराज फाये, उल्हास देशमुख, चेतन गहाणे, प्रा विनोद नागपूरकर, राहूल गिरडकर, नितेश देशमुख, प्रशांत हटवार हरीश तेलका, स्वप्निल खोब्रागडे, किशोर बनसोड, सचिन कुथे, तसेच मोठ्या संख्येत रामभक्त भाविक सहभागी झाले होते.
यावेळी शोभायात्रेत सहभागी झालेल्या रामभक्तांना सागर बाजार जवळ तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक कुरखेडा येथे शरबत वितरण करण्यात आले तसेच कुरखेडा येथे हनुमान मंदिर देवस्थान समितीच्या वतीने व साई मंदिर देवस्थान समिती कुरखेडाच्यावतीने महाभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कुरखेडा येथे निघालेल्या भव्य शोभायात्रेत गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते व आरमोरी निर्वाचन क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी श्रीराम मंदिर कुरखेडा येथे येऊन प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले व रॅलीमध्ये सहभागी होऊन राम नवमीच्या समस्त जनतेला शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here