कुरखेडा : अल्पवयीन मुलीवर अत्याचार

1306

– पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, ११ ऑक्टोंबर : तालुक्यातील एका शासकीय निवासी आदिवासी आश्रमशाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना ९ ऑक्टोबरला उजेडात आली. याप्रकरणी पुराडा पोलिस ठाण्यात बलात्कार व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधित कायद्यान्वये गुन्हा नोंद झाला आहे.
पीडित मुलगी तालुक्यातील एका शासकीय आश्रमशाळेत शिकते. आश्रमशाळेच्या वसतिगृहात ती राहत असून ९ ऑक्टोबरला तिची प्रकृती अचानक खालावली त्यामुळे तिला शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तापसणीअंती तिच्यावर अत्याचार झाल्याचे समोर आले. याप्रकरणी एका तरुणावर पुराडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे मात्र सध्या तो पसार असून त्याचा शोध घेणे सुरू आहे अशी माहिती प्रभारी अधिकारी भूषण पवार यांनी दिली.
सदर घटनेबाबत
माजी जि. प. सदस्य प्रभाकर तुलावी, आश्रमशाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रल्हाद नैताम, सामाजिक कार्यकर्ते नाजूक दखणे, रतीराम टेकाम, सुधाकर गावळे यांनी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक तुमसरे यांची भेट घेऊन जाब विचारला. या प्रकरणात गुन्हा नोंदविला असून आश्रमशाळा प्रशासन संवेदनशीलपणे विषय हाताळत असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here