The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, दि. ०७ : तालुक्यातील एका विवाहित तरुणाने झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना बुधवार ६ मार्च रोजी आंधळी येथे उघडकीस आली. किरपाल रामजी भोंडे ( वय ३१) रा. आंधळी ता. कुरखेडा असे मृतकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, किरपाल च्या घरात कौटुंबिक कलह वाढल्याने पत्नी महिनाभरापूर्वी माहेरी निघून गेली, सततच्या भांडणतंट्यामुळे व पत्नी माहेरी गेल्यापासून किरपाल हा नैराश्येत हाेता असे कळते. दरम्यान ६ मार्च रोजी सकाळी गावालगतच्या चिंचेच्या झाडाला गळफास लावलेल्या स्थितीत
किरपाल चा मृतदेह आढळून आला. याबाबतची माहिती तात्काळ कुरखेडा पोलीसांना देण्यात आली असता पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करीत उत्तरीय तपासणीसाठी कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. किरपाल ने अशाप्रकारचे पाऊल का उचलले त्याचे कारण कळू शकले नाही. त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, आई व भाऊ आहे. पुढील तपास कुरखेडा पोलीस करीत आहे.
(#thegdv #thegadvishva #hscexam #police #kurkheda #gadchirolinews #gadchirolipolice )