कुरखेडा : रानटी हत्तीचा कळप कुमुडपार जंगल परिसरात

1316

– नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे वनविभागाचे आवाहन
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. ०६ : तालुक्यातील कुमुडपार जंगल परिसरात रानटी हत्तीचा कळप सध्यास्थितीत असून शनिवार ६ जुलै रोजी सकाळच्या सुमारास कळपातील एक हत्ती वेगळा होऊन धनेगाव येथील पहाडी नजीक शेतकऱ्यांना अचानकपणे आढळून आला.
हत्तींचा कळप हा मादा हत्तींचा असतो. नर हत्ती वयात आल्यावर तो कळप सोडतो / कळपातून हाकलला जातो. असा हत्ती विशेषकरून धोकादायक असल्याचे सांगतात. कारण तो नुकताच कळपातून वेगळा झाल्याने विचलित असतो, शिवाय आकाराने थोडा लहान असल्याने वेगात पळू शकतो. त्यामुळे मालेवाडा परिसरातील शेतकऱ्यांनी व देसाईगंज, कुरखेडा, धानोरा, गडचिरोली, कोरची, आरमोरी, या सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांनी व लोकांनी सतर्क राहावे, सकाळी एकट्याने शेतावर जावू नये तसेच जंगल परिसरात प्रवेश करु नये. उशिरा रात्र पर्यंत शेतात थांबू नये ही दक्षता बाळगावी अश्या सूचना जिल्हा प्रशासन व वन विभागाने दिल्या आहेत.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #wildelephant #kurkheda #malewada )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here