कुरखेडा : उराडी येथे २३ वर्ष दारूविक्री बंदी टिकवून विजयस्तंभ उदघाटन सोहळा साजरा

271

The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, २८ फेब्रुवारी : तालुक्यातील उराडी येथे १ आगस्ट २००० पासून महिला संघटनेच्या माध्यमातून दारू विक्री बंदी आहे. आज दारुविक्री बंदी होऊन २३ वर्ष पूर्ण झाले. त्याच माध्यमातून दारूबंदी संघटना, स्थानिक पदाधिकारी, गावकरी यांच्या सहकार्यातून विजयस्तंभ उभारून उदघाटन सोहळा साजरा करण्यात आला. गावात सकाळ पासून संघटनेच्या महिलांनी साफसफाई करून सर्व गावाकऱ्यांना उदघाटन सोहळ्यात येण्याचे आवाहन केले.
यावेळी उदघाटक म्हणून दत्तात्रय क्षीरसागर (महाराज), प्रमुख पाहुणे म्हणून मयूर राऊत, कुरखेडा मुक्तीपथ तालुका कार्यालयातील विनोद, सरपंचा सौ. सोनीताई वट्टी, उपसरपंच राधेश्याम दंडमल, ग्रा. स. विजय सोमवंशी, डॉ. सुमंगल मल्लिक, दारूबंदी संघटना अध्यक्ष सौ. आशाताई मरस्कोल्हे, दारूबंदी संघटना सचिव सौ. वर्षाताई सुकारे इ. उपस्थित होते.
गावाच्या मुख्य प्रवेश द्वाराजवळ दारुविक्री बंदी विजयस्तंभ उदघाटन सोहळा दत्तात्रय क्षीरसागर (महाराज), सरपंच व उपसरपंच यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी दारूबंदी महिला, स्थानिक पदाधिकारी, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उदघाटन झाल्यावर सर्व उपस्थितांना संबोधित करतांना दारूबंदी महिला भावुक झाल्या. त्यांनी दारूबंदी करतेवेळी झालेला त्रास सांगितला. आज एकूण ३० महिलांचे संघटन असून त्यांना स्थानिक पदाधिकारी व गावकरी मोठ्या उत्साहाने मदत करतात. आज त्यांच्या कार्यात यश असून मेंढा, सोनेरांगी, वाशी, मोहगाव या गावातील दारुविक्री बंदी करून देण्यात या महिलांचे मोलाचे योगदान आहेत. शेवटी सर्व उपस्थिताना नास्ता व चहा देऊन उदघाटन सोहळ्याची सांगता झाली.
यावेळी दारूबंदी संघटनेच्या सक्रिय कार्यकर्त्या सौ. लीलाबाई बोरकर, कांताबाई दडमल, अनुसया सुकारे, भिवराबाई मस्के, पार्वताबाई डोंगरवार, गौरवाबाई वंजारी, मीराबाई कोकोडे, वसंता दडमल व इतर सदस्यांनी उदघाटन सोहळा यशस्वी करण्यात मोलाचे योगदान दिले.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (The Gdv) (Kurkheda) (Uradi) (Darubandi Vijaysthambh)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here