कोरची : बाजार चौकातील २५ वर्षे जुन्या अतिक्रमणावर चालला न.पं. चा बुलडोझर

707

– कारवाई ने व्यवसायिकांमध्ये खळबळ
The गडविश्व
कोरची, ४ मार्च : येथील बाजार चौकात जवळपास २० ते २५ वर्षांपासून असलेल्या अतिक्रमणावर नगर पंचायत प्रशासनाने शुक्रवारी बुलडोजर चालवत कारवाई केली. सदर कारवाईने व्यवसायिकांमध्ये एकच खळबळ निर्माण झाली आहे.
कोरची येथील बाजार चौकात मागील २० ते २५ वर्षांपासून लहान-मोठे व्यवसायिक दुकान थाटून आपला उदरनिर्वाह करीत होते. नगर पंचायतने सदर जागेवर संकुल निर्माण करण्यासाठी मंजुरी मिळाल्यानंतर बाजार चौकातील अतिक्रमण धारकांना नोटीस पाठवून २ मार्च पर्यंत अतिक्रमण हटविण्यास सांगितले होते. मात्र नोटीस बजावूनही अतिक्रमण न हटविल्याने नगर पंचायत प्रशासनाने शुक्रवारी सकाळी ९ वाजता पासून पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली. या कारवाईत नगरपंचायतीचे मुख्याधिकारी तथा तहसीलदार माळी, उपमुख्याधिकारी बाबासो हाक्के, नगर पंचायत उपाध्यक्ष हिरा राऊत सह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सदर कारवाईने मात्र व्यवसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली असून रोजगार हिरावला गेल्याचे बोलल्या जात आहे.

(The gadvishva) (Gadchiroli News Updates) (The Gdv) (Mla Sudhakar adbale) (Dhanora Nagar Panchyat) (Korchi) (Tahsildar Mali)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here