कोरची : पुन्हा बेडगाव घाटावर अपघात, ट्रक दरीत कोसळला

913

– घाटावर अपघाताची मालिका सुरू
The गडविश्व
कोरची, १४ एप्रिल : तालुक्यातील बेडगाव घाटावर पुन्हा अपघात झाला असून बुधवारी रात्री ट्रक ३० फूट दरीत कोसळल्याचे समोर येत आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे बोलल्या जात आहे. मात्र या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
कुरखेडा-कोरची मार्गावर नागमोडी घाट आहे. या मार्गावर अवजड वाहनांची वर्दळ असते. सदर मार्ग हा छत्तीसगड राज्यात जात असल्याने या मार्गे अवजड वाहन जात असतात. अनेकदा या घाटावर अपघात झाले आहेत. बुधवारी एमएच ४० बी. जी १७४९ क्रमांकाचे ट्रक हैद्राबादवरून मक्क्याची बिजाई भरुन रायपुरला निघाली होती. मात्र, रात्रीच्या सुमारास बेडगाव घाटावरील पहिला चढाव चढल्यावर उतारावरील वळणावर वाहकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक ३० फूट दरीत जाऊन घुसली. यावेळी समोरुन कुठलेही वाहन येत नसल्याने मोठा अपघात टळला. काही दिवसांपूर्वीच या घाटावर ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने अपघात झाला होता यात दोघांना जीव गमवावा लागला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here