रांगी ते बेलगाव मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य

103

The गडविश्व
गडचिरोली, दि. १० : तालुक्यातील रांगी ते बेलगाव रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले असून वाहन धारकांना स्वतःचा जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
रांगी वरुन गडचिरोलीकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. सध्या या मार्गावर मोठीच वर्दळ असते, चारचाकी वाहने व एस.टि.महामडळाची बस सुद्धा चालते परंतु रांगीच्या समोर असलेल्या बेलगाव दरम्यानचा रस्ता वाहन चालकांना मोठा त्रासदाय झालेला आहे. जागोजागी खड्डे पडलेले आहेत, मागे या मार्गावर काही खड्डे बुजविण्यात आले मात्र आद्यपही काही बाकी जशाचे तसेच ठेवल्याने वाहन धारकांना कमालिचा त्रास सोसावा लागत आहे. प्रशासनाने सदर रस्त्याचे दुरुस्ती करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
रांगी परिसरातील कार्यरत असलेले शाळांचे शिक्षक, जिल्हा परिषद, खाजगी शाळांचे शिक्षक, आरोग्य कर्मचारी, वन विभागाचे कर्मचारी, बँकेचे कर्मचारी याच मार्गाने गडचिरोली जातात मात्र रस्त्यांची दुरवस्था झाली असल्याने पाठीच्या मनक्याचा व कमरेचा त्रास सहन करावा लागत आहे. फक्त ६ कि.मी.अंतरात अनेक ठिकाणी डांबरीकरण उकडून खड्डे निर्माण झाले आहेत. काही ठिकाणी रस्ता फुटला आहे. या मार्गाची वेळीच दखल घेऊन रस्ता दुरुस्त करण्याची मागणी वाहन धारक, कर्मचारी प्रवाशी यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here