नक्षल्यांकडून आधी तरुणाचे अपहरण ; नंतर केली हत्या

1662

– पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयातून हत्या
The गडविश्व
कांकेर, दि.२१ : जिल्ह्यातील कोयालीबेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत नक्षल्यांनी तरुणाचे आधी अपहरण करून नंतर जनता न्यायालय आयोजित करून हत्या केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयातून अपहरण करून हत्या करण्यात आली आहे. अमरसिंह उईके असे मृतक तरुणाचे नाव आहे.
हत्येनंतर नक्षल्यांनी अनेक ठिकाणी बॅनर लावून त्याची जबाबदारीही घेतली असल्याचे कळते. दरम्यान घटनेची माहिती पोलिसांना कळविण्यात आली असून पुढील तपास करीत आहे.नक्षल्यांनी हा तरुण डीआरजीसाठी माहिती देणारा असल्याचा आरोप केला असून २१ ऑक्टोबर रोजी झालेल्या चकमकीत त्याने डीआरजीला नक्षलवाद्यांचे ठिकाण सांगून दोन निष्पाप तरुणांचा बळी घेतल्याचा आरोप आहे. त्यामुळे अमरसिंह यांना जनता न्यायालय स्थापन करून फाशीची शिक्षा सुनावली आहे असे बॅनर मधून सांगितले आहे. या घटनेने परिसरात दहशत पसरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here