राखी येथील दारू बंदीसाठी दोन गावातील महिलांकडून संयुक्त प्रयत्न

128

-१८ हजारांचा मुद्देमाल नष्ट
The गडविश्व
गडचिरोली, २ ऑक्टोबर : तालुक्यातील राखी येथील अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी गुरवळा व राखी येथील गाव संघटनेच्या महिलांनी संयुक्त प्रयत्न सुरू केले आहे. आतापर्यंत अनेक कृती करून विक्रेत्यांना धडा शिकवला आहे. अशातच पोलिस विभागाच्या सहकार्याने कारवाई करीत विक्रेत्यांचा 18 हजारांचा मोहफुलाचा सडवा व साहित्य नष्ट केले.
राखी येथे मोठ्या प्रमाणत दारू विक्री केली जात असल्याने बाजूच्या गावातील लोक दारू पिण्यासाठी येत होते. त्यामुळे गावातील शांतता व सुव्यवस्था धोक्यात आली. आरोग्य व होणारे आर्थिक नुकसान लक्षात घेता राखी येथील दारू बंद करण्यासाठी येथील ग्रामसभेत विषय ठेवण्यात आला. यावेळी गुरवडा व राखी येथील महिला ग्रामसभेत उपस्थित राहुन दारू बंदीचा निर्णय घेतला. सोबतच मुक्तीपथ गाव संघटन गठित करून दारू विक्रेत्यांचे विरोधात पोलीस विभागाला निवेदन देण्यात आले. दारू मुक्त पोळा करण्यासाठी रॅली काढून जाणीव जागृती केली. पोळ्याच्या नंतर गाव संघटन यांचे माध्यमातून व्यसन उपचार शिबिर आयोजित करून २१ पेशंट नी उपचार घेतला. दारू विक्रेत्यांवर पाळत ठेवून दारू विक्रेत्यांवर धाड सत्र सुरू आहे. येथील मुक्तीपथ गाव संघटनेकडून २० दिवसापासून पोलीस तक्रार करणे, दारू विक्रत्यांची घर तपासणे, मोहा सडवा नष्ट करणे, गावात वेगवेगळ्या कृती करून दारू बंदीसाठी प्रयत्न सुरू आहेत. अशातच गुप्त माहितीचे आधारे पोलीस व मुक्तीपथ गाव संघटनेनं शोध मोहीम राबवित १८ हजार रुपये किमतीचे ४ ड्रम मोह सडवा व साहित्य नष्ट करण्यात आला. सदर कार्यवाही पोलीस निरीक्षक अरुण फेगडे यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यावेळी गाव संघटन व पोलीस विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here