एमएससीआयटीच्या परीक्षेत पूर्ण गुण प्राप्त करत जयंतने घेतली गरुडझेप

171

The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा (चेतन गहाने), १२ ऑक्टोबर : येथील क्रिस्टल कॉम्प्युटर अँड टेक्निकल एज्युकेशन संस्थे मध्ये एमएससीआयटी या महाराष्ट्र राज्य माहिती व तंत्रज्ञान प्रमाणपत्र अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेऊन अभ्यासक्रम पूर्ण करत जयंतने परीक्षेत पूर्ण मार्क प्राप्त करत गरुड झेप घेतली आहे.
तीन महिने नियमित संस्थेतील डिजिटल ई लर्निंग द्वारे झालेल्या सदर प्रशिक्षणाची ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेमध्ये जयंत चमकातन यांनी ५० पैकी ५० गुण प्राप्त करत पाहिले स्थान प्राप्त केले आहे.
जयंत जमकातन यांच्या या उपलब्धीची सर्व स्तरावरून प्रशंसा केली जात आहे.
क्रिस्टल कॉम्प्युटर अँड टेक्निकल एज्युकेशन या संस्थेतील आधुनिक संसाधन सुविधा व गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन याच्या आधारावरच आपण शंभर टक्के गुण प्राप्त करू शकलो अशी भावना जयंतने व्यक्त केली आहे. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय प्रशिक्षक संस्थेचे संचालक शाहिद हाशमी यांना दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here