उद्या उद्योजकता विकास प्रशिक्षणासाठी मुलाखत

175

The गडविश्व
गडचिरोली,दि. २२ : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, गडचिरोली द्वारा आयोजित संत रोहीदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादीत (लिडकॉम), महाराष्ट्र शासन, पुरस्कृत अनुसूचित जाती चर्मकार (चांभार, ढोर, होलार, मोची) प्रवर्गाकरीता गडचिरोली येथे उद्योजकता विकास प्रशिक्षण 27 फेब्रुवारी 2024 ते 28 मार्च 2024 या कालावधीमध्ये आयोजित करण्यात येत आहे. त्याकरिता एक दिवसीय उद्योजकता परिचय कार्यक्रम शुक्रवार 23 फेब्रुवारी 2024 रोजी वेळ सकाळी 11.00 वाजता सामाजिक न्याय भवन, आयटीआय चौक, गडचिरोली येथे आयोजन करण्यात आलेले आहे.
तरी ईच्छुक उमेदवारांनी अधिक माहिती व मुलाखतीकरिता 23 फेब्रुवारी 2024 ला “सामाजिक न्याय भवन, आयटीआय चौक, गडचिरोली येथे हजर राहावे. अधिक माहीतीकरीता संदीप जाने, प्रकल्प अधिकारी, एमसीईडी, मो. 9637536041 व स्मिता पेरके, कार्यक्रम समन्वयक, मो. 9175229413, यांना संपर्क करावा असे आवाहन आयोजकांनी केलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here