The गडविश्व
गडचिरोली, ४ सप्टेंबर : मारकबोडी येथे सप्टेंबर महिन्याचा पहिला शनिवार ‘जागतिक गिधाड संवर्धन दिन’ गडचिरोली वनविभाग गडचिरोली तथा वनपरीक्षेत्र अधिकारी गडचिरोली यांच्या संयुक्त विध्यमाने व मिलीश शर्मा उपवनसंरक्षक गडचिरोली वनविभाग गडचिरोली यांच्या मार्गदर्शनात व अरविंद पेंदाम वनपरीक्षेत्र अधिकारी यांच्या प्रयोजनात ‘आंतरराष्ट्रीय गिधाड संवर्धन दिन’ साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष दीपक वडेंगवार अद्यक्ष संयुक्त वनव्यवस्थापन समिति मारकबोडी, पंडित मेश्राम पोलीस पाटील मारकबोडी, पौर्णिमा पालकवार उपसरपंच डोंगरगाव, प्रमुख अतिथी अजय कुकुडकर सर्पमित्र व जलद बचाव दल सदस्य, मुख्य मार्गदर्शक धर्मराव दुर्गमवार वनरक्षक येवली’ मकसूद सय्यद जलद बचाव दल , सौरभ सातपुते, हरदिश वैरागडे यांच्या उपस्तितीत घेण्यात आला.
गिधाड हे पर्यावरणाचे स्वच्छक आहेत. पर्यावरण संतुलन ठेवण्यासाठी गिधाड पक्ष्याचे निसर्गावर, मानव घटकावर अनंत उपकार आहेत. गिधाड पक्षी डायकलोपेनाक औषधच्या दुष्परिणामामुळे नामशेष होण्याच्या मार्गांवर आहेत, त्यांचे संरक्षण व संवर्धन करणे काळाची गरज आहे. याकरिता भारतीय शासन व जागतिक स्थरावरील शासन व्यवस्था मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे.
एखादा पक्षी वा प्राणी नामशेष झाल्यास त्याचे कोरोना सारखे गंभीर परिणाम मानव जातीला भोगावे लागणार आहेत. 1980 मध्ये गिधाड पक्षाचे थवे च्या थवे दुसून येत होते. परंतु मानावाच्या चुकीच्या जिवन शैलीमुळे गिधाड पक्षी नामशेष होण्याच्या मार्गांवर आहेत. त्याकरिता गडचिरोली वनविभाग गडचिरोली मौजा दर्शनी, मारकबोडी, वाकडी व बोधली येथे गिधाड उपगृहाची निर्मिती करून गिधाड पक्ष्याचे संरक्षण व संवर्धन करण्याचा विडा उचललेला आहे.
यासाठी लोकसहभागातून गिधाड उपहार गृहात, पाळीव मृत झालेले प्राणी लोकांच्या सहकार्याने टाकण्यात येत आहेत. त्यांना प्रोत्साहन म्हणून मृत पाळीव प्राणी मालकास ₹500/- वाहतूक करणाऱ्यास ₹500/- गिधाडमित्र यांना ₹300/- व कातडी सोलून देणाऱ्यास ₹300/- असे एकूण ₹1600/- ही रक्कम लाभार्त्याच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे.
या कार्याची दखल घेऊन अनेक विभागाचे सुजाण अधिकारी व बाहेर गावाचे प्रतिष्टीत नागरिक गिधाड उपहारगृह मारकबोडी येथे सेवा देत आहेत. त्यामुळे वनविभागाला गिधाड संवर्धन करण्यास मदत होत आहे. त्यामुळे अनेक लाभार्त्यांचा व गिधाडमित्रांचा सत्कार आंतरराष्ट्रीय गिधाड संवर्धन दिन कार्यक्रमात करण्यात येऊन सर्वांचे वनविभाग कर्मचाऱ्यांनी कौतुक केले.
या सर्व लोकांच्या सहभागमुळे गडचिरोली वनविभागातील मारकबोडी गिधाड उपहारगृहात पांढऱ्या पाठीचे गिधाड, लांब चीचीचे गिधाड 25 एफ्रिल 2023 ला 10 ते 12 गिधाड पक्षाचे दर्शन झाले. त्यामुळे अनेक गिधाड पक्षीप्रेमी व पक्षीप्रेमी हे सुखावले व गिधाड पक्षाचे दर्शन करण्यासाठी भेटी दिल्या. त्यांचेही वनकर्मचाऱ्यांनी आभार मानले.
आपल्या गडचिरोली जिल्ह्यात एकूण 150 -180 गिधाड पक्ष्याची नोंद आहे. गिधाड उपहारगृह गिधाड पक्षी उतरतात अश्या ठिकाणी तयार करण्याची लोकमागणी आहे. गिधाड पक्षी अगदी विमानाप्रमाणे उतरतात व उडतात त्यामुळे त्यांना मोकळी जागा व दूरवर लांब असणारे मोठी झाडे असणे आवश्यक आहे. सामान्य नागरिक सुद्धा गिधाड पक्ष्याचे जतन करण्यासाठी सर्वसावलेला आहे. त्यांचे पण कौतुक कार्यक्रमातून करण्यात आले.
गिधाड पक्षाचे संरक्षण करण्यासाठी वनविभाग कार्यरत आहे. गिधाड पक्षी दिसताच गिधाडमित्र वा वनकर्मचारी यांना कळवून त्यांना सहकार्य करण्याचे यावेळी आव्हाहन करण्यात येत आहे. असा संदेश व मार्गदर्शन यामधून मान्यवरांनी कार्यक्रमातून दिला. यासंदर्भात जाणीव जागृती करण्यासाठी सदर कार्यक्रम यशस्वी पणे पार पाडण्यात आला. यासाठी नियतक्षेत्र येवली मधील गिधाडमित्र व पक्षीप्रेमी व प्रतिष्ठित नागरिकांनी सदर कार्यक्रमात सहभाग घेतला. लावूड स्पिकारच्या स्वर्ण मधुर आवाजात व अल्पउपहार मेजवानीत आंतरराष्ट्रीय गिधाड संवर्धन दिन सायंकाळी 5:00 वाजता सर्वांच्या सहकार्याने साजरा करण्यात आला.
यावेळी विशेष सहकार्य मा. रुपेश चुधरी ग्राम पंचायत सदस्य डोंगरगाव, तथा गिधाड मित्र , गजू तुंकलवार सफारी सदस्य, दिलीप भुरसे, कमलाकर कोमलवार, मोहन कुनघडकर, देविदास सोदुरवार, रामजी पालकवार, मोहन तुंकलवार, शामरॉव कोहळे, निळखंत झाडें, शेसरॉव बोरावार, शुभांगी नेचलवार, किशोर तुंकलवार, जोसेफ बर्लवार्, आकाश मोहुर्ले, लोमेश रोहणकर, नादाजी सोडुरवार, पुंडलिक सोडुरवार, शंकर निखुरे, मिथुन मंतकवार, आशिक बर्लवार् सफारी गाईड्स, ऋषी भांडेकर, काशिनाथ मुसदिवार, पुरषोत्तम मेश्राम, सूदर्शन भुरसे, विलास कुनघडकर, गावकरी मंडळी उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करण्यात आला.