The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. १५ : तालुक्यातील चिचटोला येथील जि. प. प्राथमिक शाळा येथे भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्याच्या उत्साहाने व देशभक्तीच्या चैतन्याने ध्वज स्तंभाचे पूजन व ध्वजारोहण कार्यक्रम ग्रा.पंचायत सदस्य रामसाय मडावी यांच्या हस्ते पार पाडण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माधव सिंद्राम, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष , गणेश मडावी, अतुल सिंद्राम, धनराज नैताम, उकेश सोरी, विश्वनाथ सिंद्राम, ग्यानदास मडावी, शुभास मडावी, सुगण सिंद्राम, सुशीला कोराम, इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थी -शिक्षक- पालक यांना तंबाखूमुक्त ची शपथ देण्यात आली. तसेच शालेय विद्यार्थ्यांना स्वप्नपूर्ती फाउंडेशन तर्फे यांच्याकडून विद्यार्थ्यांना बुक, पेन वाटप करण्यात आले.
मुख्याध्यापीका सहारे यांनी 1947 स्वातंत्र्याबाबतीत ब्रिटिश राजवटी बाबतीत व क्रांतिवीरांची गाथा विद्यार्थ्यांना व गावकरी बांधवाना मंचावर व्यक्त करून त्याची जाणीव करून दिले. कार्यक्रमाचे संचालन
वाढई यांनी केले.
(#thegdv #gadchirolinews #thegadvishva #gadchirolipolice )