इंदाराम येथे जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते धान खरेदी केंद्राचे शुभारंभ

240

The गडविश्व
अहेरी, २६ नोव्हेंबर : आदिवासी विकास महामंडळ उपप्रादेशिक कार्यालय अहेरी अंतर्गत इंदाराम येथे आदिवासी विविध कार्यकारी संस्था मार्फत धान खरेदी केंद्र असून सदर धान खरेदी केंद्रात या हंगामातील धान खरेदी सुरू करण्यात येत असून आज जि.प. माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आले. शेतकऱ्यांचे या हंगामातील धान मळणीची प्रक्रियेला सुरुवात झाली असून या हंगामातील धान खरेदी केंद्राचे शुभारंभ करण्यात आले.
शासनने किंमत निश्चित केले असून धानाला २,०६० – २,०४० रुपये भाव घोषित केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले धान बाहेर विक्री न करता थेट शासकीय गोदामात शेतकऱ्यांनी धानाची विक्री करावी असे आवाहन जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केले.
यावेळी इंदारामचे सरपंचा सौ.वर्षाताई पेंदाम, उपसरपंच वैभव कंकडालवार, माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम, माजी सरपंच तथा विद्यमान ग्राम पंचायत सदस्य गुलाबराव सोयाम, आ.वि.कार्य.सं.अध्यक्ष जयराम आत्राम, भीमा पेंदाम, श्रीनिवास कोतावडलावार, बाजीराव गावडे, तेजू दुर्गे, लालू मडावी, फकीरा पेंदाम, प्रकाश कोसरे, बिचू मडावी, सचिव तुमडे, सुखदेव पेंदाम, विश्वनाथ आत्राम, ग्रामसेवक किरंगे ग्रा.पं. कर्मचारी रोशन सम्मालवार आदि शेतकरी व प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here