– विद्यार्थ्यांच्या पालकांना सोसावा लागेल भुर्दंड
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि.१२ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जुलै- ऑगस्ट २०२४ व फेब्रुवारी /मार्च २०२५ मधे बोर्डाची परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना झटका देत परिक्षा शुल्कात वाढ केल्याने यांचा फटका विद्यार्थ्यांना बसणार आहे.
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र पुरवणी परीक्षा जुलै /ऑगस्ट २०२४ व मुख्य परीक्षा २०२५ मधे परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना नव्याने फि आकारणी करण्यात आली आहे. मंडळाने तसे परिपत्रक काढले आहे. ३० एप्रिल २०२४ चा परिपत्रकात नमूद केले आहे की, नव्याने सुधारित करण्यात आलेले परीक्षा शुल्क आपल्या स्तरावरून सर्व शाळा महाविद्यालयांना अवगत करावे आणि मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावे नियमित व खाजगी विद्यार्थीना इयत्ता दहावी परीक्षा शुल्क ४७० रुपये, प्रशासकीय २० रुपये, गुणपत्रिका शुल्क लॅमिनेशन सह २० रुपये, प्रमाणपत्र शुल्क लॅमिनेशन २० रुपये, प्रात्यक्षिक परीक्षा १० रुपये, प्रात्यक्षिक परीक्षा तंत्र विषय १०० रुपये, खाजगी विद्यार्थी नाव नोंदणी अर्ज माहिती पुस्तिका १३० रुपये, खाजगी विद्यार्थी नोंदणी शुल्क १२१० रुपये, श्रेणी सुधार सुधारित परीक्षा शुल्क आकारण्यात आले आहे.
पूर्वी हे शुल्क, नियमित विद्यार्थी पूर्वीचे शुल्क ४२० रुपये तर आता ४७० रुपये, पूनरपरीक्षार्थी पूर्वीचे शुल्क ४२० रुपये तर आता ४७० रुपये, श्रेणीसुधारसाठी पूर्वीचे शुल्क ८४० रुपये तर आता ९३० रुपये आहेत.
यामुळे गरिबी व गरजू विद्यार्थ्यांना मोठा फटाका बसणार आहे. पालकांची आर्थिक परिस्थिती चांगली नसतानाही परिक्षेकरिता येवढे मोठे शुल्क देने म्हणजे तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #sscexam )
