” एक गाव, एक वाचनालय” उपक्रमांतर्गत पोस्टे एटापल्ली येथे पार पडला नवीन सार्वजनिक वाचनालय इमारतीचा उद्घाटन व लोकार्पण सोहळा

141

– पोस्टे एटापल्ली परिसरातील लोकांचा वाचनालय उभारणीत स्वयंस्फुर्तीने सहभाग.
The गडविश्व
गडचिरोली, १६ एप्रिल : जिल्ह्यातील अतीदुर्गम भागात कार्यरत असलेल्या सर्व पोस्टे / उपपोस्टे / पोमकें हद्दीतील शालेय विद्यार्थी, सुशिक्षित बेरोजगार, महिला-पुरुष यांना शासनाच्या मुख्य प्रवाहात आणुन त्यांच्या शिक्षणासह बौद्धीक कला गुणांना वाव मिळावा, त्यांच्या वैचारिक क्षमतेत वाढ होऊन त्यांच्या विचारात बळ यावे व नक्षल – विचारधारेकडे आकर्षीत होवू नये. तसेच त्यांना जगात घडत असलेल्या विविध आंतरराष्ट्रीय/राष्ट्रीय/प्रादेशिक / स्थानिक घडामोडी, शासकिय योजना इ. बाबत माहिती मिळावी व वाचनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची व स्पर्धापरिक्षा विषयीची ओढ निर्माण व्हावी तसेच त्यांच्या उज्वल भविष्याकडे वाटचाल व्हावी यासाठी गडचिरोली पोलीस दल मा. पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा. यांच्या संकल्पनेतून “एक गाव, एक वाचनालय” हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे.
या उपक्रमांतर्गत पोस्टे एटापल्ली परिसरातील नागरिक व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने लोकवर्गणी व श्रमदानातुन एटापल्ली येथे नवीन इमारतीमध्ये सुसज्ज व आधुनिक सार्वजनिक वाचनालयाची निर्मीती करण्यात आली. सदर वाचनालयाचे उद्घाटन डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य १४ एप्रिल २०२३ रोजी अपर पोलीस अधीक्षक कुमार चिंता सा. यांचे उपस्थितीत एटापल्लीचे साधुन आज सेवानिवृत्त आदर्श शिक्षक ज्ञानेश्वर कोवे, अध्यक्ष गायत्री परिवार एटापल्ली यांच्या हस्ते सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा पार पडला. सार्वजनिक वाचनालयाच्या उद्घाटनाप्रसंगी संविधान उद्देशपत्रिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. या लोकार्पण सोहळ्यास पोस्टे एटापल्ली हद्दीतील ६०० ते ७०० च्या संख्येने नागरीक उपस्थित होते. सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांचे आगमन होताच पोस्टे पासुन ते सार्वजनिक वाचनालयापर्यंत पारंपारीक रेला नृत्यासह ग्रंथदिंडीला सुरुवात करण्यात आली. गावातील प्रमुख मार्गावरुन शालेय विद्यार्थी व स्थानिक नागरीकांसह ग्रंथदिंडी वाचनालयापर्यंत काढण्यात आली. यादरम्यान प्रमुख मान्यवरांच्या हस्ते संविधान चौक नामफलकाचे अनावरण करण्यात आले. व इतर प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला. वाचनालयामध्ये स्वतंत्र अभ्यासिका, मोफत वाय-फाय ची सुविधा, बैठक व्यवस्थेकरीता टेबल, चेअर, बुक ठेवण्याचे कपाट व इतर मुलभुत सुविधेसह सार्वजनिक वाचनालय उपलब्ध करुन देण्यात आले.
अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता सा. यांनी आपल्या मार्गदर्शनात म्हटले की, सदर वाचनालयाचा नागरीकांनी / विद्यार्थांनी परिपुर्ण फायदा घ्यावा. तसेच या वाचनालयातून अनेक विद्यार्थी प्रशासकीय क्षेत्रात यावे व लवकरच या सार्वजनिक वाचनालयामध्ये ई-लर्निंग सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. तसेच शुभम गुप्ता सा. उपविभागीय अधिकारी एटापल्ली यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हटले की, विद्यार्थांनी नेहमी पुस्तकाच्या सानिध्यात राहले पाहीजे. पुस्तकाच्या सानिध्यात राहुन ज्ञानप्राप्त करुन यश मिळवावे. व मा. अपर पोलीस अधीक्षक अहेरी यतिश देशमुख सा. यांनी वाचनालयाच्या उद्घाटन प्रसंगी विद्यार्थांशी संवाद साधतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिवशी हा उपक्रम होत आहे. ते आपल्या सर्वासाठी आनंदाची बाब आहे. वाचनाने विद्यार्थी ज्ञानसमृद्ध होतो आणि ज्ञानसमृद्ध विद्यार्थी स्वतःचे अस्तीत्व निर्माण करतो. या संबोधनातुन विद्यार्थी व नागरिकांना शिक्षण व वाचनाविषयीचे महत्व पटवून दिले.
सदर लोकार्पण सोहळ्यास गडचिरोली जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता सा., शुभम गुप्ता सा. उपविभागीय अधिकारी, एटापल्ली अपर पोलीस अधीक्षक अहेरी यतिश देशमुख सा., उपविभागीय पोलीस अधिकारी एटापल्ली सुदर्शन राठोड, शेखावत, १९१ बटालियन, पवार, पोलिस निरीक्षक रा. रा. पो. ब. १४, ज्ञानेश्वर कोवे अध्यक्ष गायत्री परिवार एटापल्ली तसेच परिसरातील सरपंच, पोलीस पाटील, पत्रकार, शालेय विद्यार्थी व स्थानिक प्रतिष्ठीत नागरीक उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी, एटापल्ली सुदर्शन राठोड, पोस्टे एटापल्ली प्रभारी अधिकारी विजयानंद पाटील, पोउपनि कांबळे, मपोउपनि सविता काळे व सर्व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.

(The gdv) (the gadvishva) (gadchiroli news ) (muktipath) (serch gadchiroli) (PSG vs Lens) (News today) (Ashraf Ahmed) ( Breaking News) (Femina Miss India 2023) (Atiq Ahmed)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here