अपर पोलीस महासंचालक यांच्या उपस्थितीत नवनिर्मीत पोलीस स्टेशन वांगेतुरी येथे जनजागरण मेळावा

141

– आदिवासी बांधवांना विविध साहित्यांचे वाटप
The गडविश्व
गडचिरोली, दि. २३ : अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) म. रा. मुंबई प्रविण साळुंके सा. यांनी आज गुरुवार २३ नोव्हेंबर रोजी गडचिरोली पोलीस दलाच्या अतिदुर्गम भागात नवीन स्थापन झालेल्या पोलीस स्टेशन वांगेतुरीला भेट दिली. या भेटी दरम्यान गडचिरोली पोलीस दलांतर्गत आयोजित पोस्टे वांगेतुरी येथील जनजागरण मेळाव्यास उपस्थित राहुन येथील आदिवासी बांधवांना विविध साहित्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी आयोजीत जनजागरण मेळाव्यास मौजा- वांगेतुरी गाव परिसरातील 200 ते 300 च्या संख्येने नागरिक उपस्थित होते. तसेच संपूर्ण पोलीस स्टेशनची पाहणी करुन जनजागरण मेळाव्यास उपस्थित नागरिकांना धोतर, साड्या, सलवार, ब्लॅकेट, लोअर, टी-शर्ट, स्वेटर, चप्पल, स्प्रे-पंप, स्वयंपाक साहीत्य (गंज, वाटे, ताट चम्मच इ.) इतर जिवनावश्यक भेटवस्तू व साहीत्यांचे वाटप केले. तसेच शालेय विद्याथ्र्यांना सायकल, ड्रेस, नोटबुक, कंपास बॉक्स, बिस्कीट पॉकेट, चॉकलेट्स, व्हॉलीबॉल नेट व बॉल, क्रिकेट साहित्य (बॅट, स्टम्प्स, बेल्स व बॉल) इत्यादी साहीत्यांचे वाटप करुन मा. अपर पोलीस महासंचालक सा. यांनी उपस्थित नागरिकांना संबोधीत करतांना सांगितले की, या नवीन पोलीस स्टेशनच्या माध्यमातून गडचिरोली पोलीस दलातर्फे आपल्या सर्व समस्या सोडविण्याचा प्रयत्न केल्या जाईल व गडचिरोली पोलीस दल राबवित असलेल्या विविध योजनांचा येथील जास्तीत जास्त नागरिकांनी फायदा घ्यावा. तसेच महाराष्ट्र राज्याच्या अगदी शेवटी असलेल्या वांगेतुरी हा भाग अतीदुर्गम जरी असला तरी, भविष्यात काही दिवसांमध्ये येथे रस्ते, आरोग्यसेवा या सोयी उपलब्ध करुन दिल्या जाईल. तसेच सदर कामासाठी येथील नागरिकांनी गडचिरोली पोलीस दलास सहकार्य करुन स्वत: पुढाकार घ्यावा असे सांगितले.
सदर कार्यक्रमप्रसंगी केंद्रीय राखीव पोलीस बलाचे पोलीस महानिरीक्षक पी. एस. रनपिसे सा., गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक संदिप पाटील सा., पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा., अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे सा., अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता सा., अपर पोलीस अधीक्षक, अहेरी यतिश देशमुख सा. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, हेडरी बापुराव दडस हे उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पोस्टे वांगेतुरीचे नवनियुक्त प्रभारी अधिकारी सपोनि. महेश विधाते तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि. धनंजय पाटील व सर्व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here