येत्या दोन ते तीन दिवसात गडचिरोली जिल्ह्यातील कृषि पंपाना पुर्वीप्रमाणे दिवसा १२ तास विज पुरवठा मिळणार

106

– उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आमदार कृष्णा गजबे यांना शब्द
The गडविश्व
मुंबई, दि .१३ : आरमोरी मतदार संघासह गडचिरोली जिल्ह्यात कृषि पंपाना दिवसा १३ तास विज पुरवठा सुरु होता. परंतु राज्यात अचानक १ हजार मेगावॉट विजेची मागणी वाढल्याने महावितरण कडुन ८ फेब्रुवारी २०२४ पासुन कृषि पंपाना १२ तास ऐवजी ८ तास विज पुरवठा सुरु करण्यात आला. त्यामुळे आरमोरी मतदार संघासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात रबी/ऊन्हाळी धान पिक व भाजीपाला उत्पादक शेतकरी विजे अभावी मोठ्या संकटात सापडले असून सर्वत्र शेतकऱ्यांकडून कृषि पंपाना पुर्ववत १२ तास विज पुरवठा करण्याची पोटतिडकीने मागणी होत होती.
आरमोरी मतदार संघासह गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जिवण मरणाशी निगडित मागणीचे गांभीर्य ओळखून आमदार कृष्णा गजबे यांनी तातडीने मुंबई गाठत राज्याचे उपमुख्यमंत्री, ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री गडचिरोली जिल्हा नामदार देवेंद्रजी फडणवीस यांची त्यांचे शासकीय निवासस्थानी भेट घेतली व आदिवासी, दुर्गम व नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची व्यथा त्यांच्या निदर्शनास आणून दिली.
त्यावर उपमुख्यमंत्री यांनी लागलीच महावितरणच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांना दुरध्वनी द्वारे संपर्क करुन गडचिरोली जिल्ह्यात कृषि पंपाना दिवसा १२ तास ऐवजी ८ तास विज पुरवठा करण्याचे शासनाचे कोणतेही आदेश नसताना ८ विज पुरवठा का करण्यात येत आहे अशी विचारणा केली असता महावितरण अधिकाऱ्यांकडुन राज्यात अचानक १ हजार मेगावॉट विजेची मागणी वाढल्याने वाढलेल्या मागणीचे नियोजन करण्यासाठी अंदाजे ८ ते १० दिवसांच्या कालावधी साठी १२ तास विज पुरवठा स्थगित करण्यात आला असुन येत्या २ ते ३ दिवसात आरमोरी मतदार संघासह गडचिरोली जिल्ह्यात कृषि पंपाना पुर्वीप्रमाणे १२ तास विज पुरवठा करण्यात येईल असे सांगितले. यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी काळजी करण्याचे काहीही कारण नसुन शासनाने निर्णय घेतल्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या कृषि पंपाना दिवसा १२ तास विज पुरवठा सुरु राहील असा आमदार कृष्णा गजबे यांना शब्द दिला. यावर आमदार कृष्णा गजबे यांनी गडचिरोली शेतकऱ्यांनी धीर सोडू नये येत्या २ ते ३ दिवसात कृषि पंपाना दिवसा १२ तास विज पुरवठा सुरु होईल असे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here