-अजित पवार गटाला धक्का
The गडविश्व
अहेरी, दि.०८ : जिल्ह्यातील अजित पवार गटाचे मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे खंदे समर्थक व गेल्या २५ वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ पदाधिकारी असलेले मल्लाजी आत्राम यांनी पक्षातील नाराजीमुळे राष्ट्रवादी पक्षाला रामराम ठोकत घड्याळाची साथ सोडत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या काँग्रेस मधील प्रवेशाने अजित पवार गटाला मोठा धक्का मानला जात आहे.अहेरी तालुक्यातील वेडमपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गुंडेरा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेल्या २५ वर्षापासून पदाधिकारी असलेले मल्लाजी आत्राम यांनी आविसं काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे निरीक्षक व गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजय कंकडालवार यांच्या नेतृत्वार विश्वास ठेवून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केला. माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी अहेरी येथील जनसंपर्क कार्यालयात सदर पक्षप्रवेश घेत नवनिर्वाचित कार्यकर्त्याचा शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #aheri #ajaykankadalwar #avis #congres)