– पोलीस भरतीकरिता आजपासून सुरुवात सुरुवात
The गडविश्व
गडचिरोली, २ जानेवारी : महाराष्ट्र शासनाने राज्यातील संपूर्ण जिल्ह्यासाठी जाहीर केलेल्या १४००० पदांच्या पोलीस भरती प्रक्रिया ही महाराष्ट्रातील विविध ठिकाणी चालु झालेली असुन, गडचिरोली पोलीस दलातर्फे राबविण्यात येणाऱ्या ३४८ पोलीस शिपाई व १६० चालक पोलीस शिपाई पदाची भरती प्रक्रिया ही सोमवार ०२ जानेवारी २०२३ रोजी पासुन गडचिरोली पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर चालु झालेली आहे. गडचिरोली जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या पोलीस शिपाई या पदाकरीता शासन निर्णय क्र. आरसीटी- १५१७/सी.आर.२४१/पोल-५ अ, तसेच चालक पोलीस शिपाई या पदाकरीता शासन निर्णय क्र. एमटीएस- – ०३१९/प्र.क्र.२४५(भाग-१) / पोल ४ या संदर्भीय अधिसुचनेनुसार, गडचिरोली जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या उमेदवारांनाच गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीमध्ये भाग घेता येणार आहे असे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी कळविले आहे.
आज पासून सुरू झालेल्या पोलीस भरतीत गडचिरोली जिल्ह्याकरिता सुरू असलेल्या पोलीस भरतीमध्ये केवळ गडचिरोली जिल्ह्यातील रहिवासी असलेल्याच उमेदवारांना प्राधान्य असेल असे स्पष्ट शासन निर्णयात उल्लेख केले असतांनाही काही इतर जिल्ह्यातील उमेदवारांनी गडचिरोली जिल्ह्यातील पोलीस भरतीकरिता अर्ज दाखल करून आज पासून सुरू झालेल्या भरतीदरम्यान उपस्थिती दर्शविली होती. दरम्यान शासन निर्णयानुसार इतर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या उमेदवारांना वगळण्यात आल्याने गोंधळ उडाला होता.
गडचिरोली जिल्ह्यातील पोलीस भरती देणाऱ्या उमेदवारांना प्रचलित नियमानूसार संबंधीत तहसिलदार यांनी दिलेला वास्तव्याचा दाखला (Residential certificate) जोडणे आवश्यक राहील, असे नमूद केलेले आहे. तसेच गडचिरोली पोलीस दलाने ०५ नोव्हेंबर २०२२ रोजी दिलेल्या जाहीरातीमध्ये स्पष्टपणे नमुद केले होते की, महाराष्ट्र शासन, गृह विभाग, अधिसूचना २३ सप्टेंबर, २०२२ अन्वये गडचिरोली जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या उमेदवारांनाच गडचिरोली जिल्हा पोलीस भरती मध्ये भाग घेता येईल. सदर उमेदवारांना प्रचलित नियमानुसार संबंधीत तहसिलदार यांनी दिलेला वास्तव्याचा दाखला (Residential certificate) जोडणे आवश्यक आहे. या आधारावरच फक्त गडचिरोली जिल्ह्यातील रहीवासी उमेदवारच सदर भरतीकरिता पात्र आहेत.
त्यामुळे उर्वरित जिल्ह्यातील उमेदवार गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई व चालक पोलीस शिपाई या पदाकरीता पात्र नाहीत. तरी आपण भरतीकरीता येऊ नये असे आवाहन गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा. यांनी केले आहे.
साध्य राबविण्यात येत असलेल्या पोलीस शिपाई पदाकरीता शा. निर्णय क्र.आरसीटी- १५१७/सी.आर.२४१/पोल-५ अ, चालक, पोलीस शिपाई या पदाकरीता शा.निर्णय क्र.एमटीएस- ०३१९/प्र.क्र.२४५ (भाग-१)/पोल ४ या नुसार, गडचिरोली जिल्ह्यातील रहिवासी उमेदवारांनाच गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीमध्ये भाग घेता येईल.
— GADCHIROLI POLICE (@SP_GADCHIROLI) January 2, 2023
(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (Police Bharti recruitment 2022) (Gadchiroli Police Recruitment) (Gadchiroli Police Recruitment 2022) (Gadchiroli SP Nilotpal)