– खासदार अशोक नेते यांच्या हस्ते समाज मंदिर बांधकामाचे भूमिपुजन
The गडविश्व
गडचिरोली, १९ ऑगस्ट : जिल्हयातील रानखेडा येथे खासदार अशोक नेते यांच्या स्थानिक विकास निधीतून मंजुर माऊली समाज मंदिराच्या कामाचे भूमिपूजन खासदार अशोक नेते यांच्या हस्ते १९ ऑगस्ट २०२३ ला रानखेडा येथे कुदळ मारून करण्यात आले.
यावेळी रानखेडा या गावात प्रत्येक घरा घरात जाऊन महाजन संपर्क अभियान अंतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या महत्वपुर्ण योजनांचे पत्रक खासदार तधा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चाचे अशोक नेते व जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांच्या उपस्थितीत स्वतः पत्रक घरा घरात जाऊन लावण्यात आले. या महाजन संपर्क अभियान अंतर्गत गावांतील जनतेशी संवाद साधला.
या कार्यक्रमाप्रसंगी खासदार अशोक नेते यांनी बोलतांना माझ्या स्थानिक विकास निधीतून माऊली समाज मंदिराला ७ लक्ष रुपये मंजुर केले. गावकऱ्यांनी यांचा चांगला लाभ घ्यावा असे प्रतिपादन व्यक्तव्य यावेळी केले.
यावेळी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा चे अशोक नेते, जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, किसान नेते उद्धवजी बोगावार, उपसरपंच्या रुपाली गांदलवार, ग्रा.प.सदस्य सुधाकर गेडाम, सदस्या निर्मला अलाम, सदस्या वर्षा तिवाडे, गणेश दहलकर, टिकाराम पानसे, यादव चौधरी, पंढरी मलोडे, मनोहर ठाकरे, प्रमोद थोराक, निंबाजी तिवाडे, डॉ. किशोर दहलकर, हरीचंद्र घुबडे, तसेच कार्यकर्ते व मोठ्या संख्येने गावकरी नागरिक उपस्थित होते.
