The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. २० : तालुक्यातील मुरुमगाव येथील गौराम दूकालूराम चिराम यांच्या घराला शॉर्ट सर्किटने आग लागून लाखोंचे नुकसान झाल्याची घटना १९ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
गौराम दूकालूराम चिराम, पत्नी सौ. कुंतीबाई,मुलगी शुभांगी,मुलगा रितेश, मुलगा राकेश हे सर्व शेतामध्ये काम करण्यास गेले होते. दरम्यान लहान मुलगा जेवण करण्याकरीता घरी आला असता घराला आग लागल्याचे त्याला दिसताच लगेच शेजारातील लोकांना आग विझवण्यात करीता बोलावून आग विझवण्यात आली मात्र तोपर्यंत लागलेल्या आगीत लाखोंचे नुकसान झाले होते. आगीमध्ये जीवनावश्यक वस्तू, दैनंदिन वस्तू, दोन टीवी तसेच शासकीय आवश्यक कागद पत्र जळून खाक झाले. जवळपास या आगीमध्ये लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती कुटुंबातील व्यक्तींना मुलाने कालविण्याने ते सुद्धा घरी दाखल होत गावातील पोलीस पाटील चंद्रशेखर ओरमडीया यांनी पंचनामा करून मुरूमगाव पोलीस यांना कळविले. मुरुमगाव पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला व विद्युत वितरण उपकेंद्र मुरुमगाव येथील कर्मचाऱ्यांकडून चौकशी करण्यात आली आहे व त्याच बरोबर राजस्व विभागातील सबंधित तलाठी यांनी स्पॉट पंचनामा केला. शासनातर्फे संबंधित विभागाकडून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी घरमालकाने केली आहे.
