अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह प्रवेश प्रक्रिया सुरु : ‘असा’ करा अर्ज

893

The गडविश्व
गडचिरोली, दि.१४ : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली अंतर्गत अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरीता १३ मुलांचे व ८ मुलींचे असे एकुण २१ शासकीय वसतीगृह कार्यरत आहेत. त्यांची एकुण इमारत प्रवेश क्षमता २११५ असुन त्यातील सन २०२४-२५ करीता रीक्त जागांवर प्रवेश घेण्याकरीता www.swayam.mahaonline.gov.in या प्रणालीमध्ये ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करावा. गडचिरोली येथे मुलांचे दोन व मुलींचे एक असे एकुण तीन वसतीगृह आहेत. गडचिरोली वसतीगृहात इयत्ता ११ वी ते पदवी, पदव्युत्तर तसेच व्यावसायीक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. तसेच गडचिरोलीचे तीन वसतीगृह वगळता उर्वरीत १८ वसतीगृहात इयत्ता ८ वी पासुन पुढे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे.
वरील संकेतस्थळावर विद्यार्थ्यांनी अर्ज भरतांना सदर प्रणालीमध्ये दिलेल्या सुचनांचे काळजीपुर्वक वाचन करावे तसेच सदरील सुचनेनुसार कागदपत्रांची जोडणी करण्यात यावी.वसतीगृहातील जुने प्रवेशित विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात प्रवेश घेऊन अर्ज रिन्यू हे ऑप्शन निवडुन भरावे. असे न केल्यास सदर विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला आहे असे समजुन त्याचेजागी नविन विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. अर्ज भरल्यानंतर ऑनलाईन अर्जाची प्रिंट काढुन कागदपत्रांसह हार्ड कॉपी संबंधीत वसतीगृहात एक आठवड्याच्या आत सादर करावी. वसतीगृह प्रवेशाचे संकेतस्थळ पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाकरीता ३१ जुलै २०२४ पर्यत व व्यावसायीक अभ्यासक्रमा करीता ३१ ऑगष्ट २०२४ पर्यंत सुरू राहील त्यामुळे विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर अर्ज सादर करावे. तसेच प्रवेशाबाबतच्या लोकप्रतिनिधी शिफारशी २५ ऑगष्ट २०२४ पर्यंत प्रकल्प कार्यालयात सादर करावे, असे सहायक प्रकल्प अधिकारी धनराज डबले यांनी कळविले आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #muktipath #World Blood Donor Day (WBDD) #sachinjiotode #akashamborkar #charudattraut #swayamraktdatasamiti #Oman vs England #Papua New Guinea vs Afghanistan #Tamilisai Soundararajan #JKBOSE 10th Result 2024 #Kuwait #Bridgerton #Florida weather # )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here