अबब… बारावीच्या परीक्षा केंद्रावर मधमाशांचा हल्ला

855

– तीन विद्यार्थ्यांसह शिक्षक जखमी
The गडविश्व
चंद्रपूर, १ मार्च : जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यातील एका परीक्षा केंद्रावर मधमाशांनी हल्ला केला यात तीन विद्यार्थ्यांसह शिक्षक जखमी झाल्याची घटना १ मार्च रोजी घडली.
राज्यात इयत्ता बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये याकरीता शहरी तसेच ग्रामीण भागात परीक्षा केंद्रे देण्यात आली आहे. पेपर सुरू होण्याच्या अर्धा तासापूर्वी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे गरजेचे असते. आज विज्ञान शाखेचा रसायन शास्त्र तसेच व्होकेशनल विषयाचा पेपर सकाळी ११:०० वाजता सुरू होणार होता. असे असतांना राजुरा तालुक्यातील पेल्लोरा येथील संजय गांधी कनिष्ठ महाविद्यालयातील परीक्षा केंद्राच्या आवारात मधमाशांनी पेपर सुरू होण्यापूर्वी अचानक हल्ला केला. मधमाशांच्या अचानक हल्ल्याने एकचं तारांबळ उडाली होती. यावेळी विद्यार्थी सैरावैरा पळू लागले मात्र यात सुरज भिमनकर, तेजस मुके, दीपक उमरे हे विद्यार्थी व मोरेश्वर लांडे हे शिक्षक मधमाशांच्या तावडीत सापडल्याने जखमी झाले. तर सुरज भिमनकर व तेजस मुके हे दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याने त्यांना तत्काळ नजीकच्या कढोली येथिल प्राथमिक उपचार केंद्रात हलविण्यात आले. सदर घटनेने सुरज व तेजस ह्या दोन्ही विद्यार्थ्यांना परीक्षेपासून मुकावे लागले असून त्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. त्यांच्या परीक्षेबाबत बोर्ड काय निर्णय घेते ह्याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागले आहे.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (Muktipath) (Chandrpur News Updates) (Chandrapur Collector) (The Gdv) (IND vs AUS) (Juventus vs Torino) (Jungkook) (Man United vs West Ham) (Justin Bieberl) (Rajura) (Honybee attack exam center)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here