– एटापल्लीमध्ये सर्वाधिक 63.8 मिमी पावसाची नोंद
The गडविश्व
गडचिरोली,दि १० : जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक प्रमुख मार्ग बंद झाले असून वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. दि. 10 जुलै 2025 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत मिळालेल्या माहितीप्रमाणे, जिल्ह्यातील एकूण 16 रस्ते पूर आणि नाल्यांना आलेल्या पाण्यामुळे बंद आहेत.
राष्ट्रीय महामार्ग 353C व 370 तसेच विविध प्रजिमा मार्गांवर असलेल्या नाल्यांना पूर आल्याने 1) गडचिरोली ते आरमोरी रस्ता राष्ट्रीय महामार्ग 353 सी (पाल नदी, कोलांडी नाला, गाढवी नदी), 2) गडचिरोली चामोर्शी राष्ट्रीय महामार्ग 353 सी (गोविदपुर नाला, शिवणी नाला), 3) आष्टी आलापल्ली राष्ट्रीय महामार्ग 353सी (दिना नदी), 4) तळोधी आमगाव रेगडी देवदा रस्ता राज्यमार्ग381(पोहार नदी), 5) अहेरी वटरा बेजुरपल्ली परसेवाडा रस्ता राज्यमार्ग 370 (वटरा नाला) तालुका अहेरी , 6) हरनघाट चामोर्शी रस्ता राज्यमार्ग 370 (दोडकुली, दहेगाव नाला), 7) चौडमपल्ली चपराळा रस्ता प्रजिमा 53 तालुका चामोर्शी
8) अरसोडा कोंढाळा कुरूड वडसा रस्ता प्रजिमा 47 तालुका देसाईगंज, 9) भेंडाळा बोरी अनखोडा रस्ता प्रजिमा 17 (हळदीमाल नाला, अनखोडा नाला) तालुका चामोर्शी, 10) वडसा वळण मार्ग प्रजिमा 41 तालुका देसाईगंज, 11) आरमोरी जोगीसाखरा शंकरनगर रस्ता प्रजिमा 48 तालुका आरमोरी (गाढवी नदी)
12) चामोर्शी मार्कंडादेव रस्ता प्रजिमा 37 तालुका चामोर्शी, 13) खरपुंडी दिभना बोदली रस्ता प्रजिमा 44 तालुका गडचिरोली, 14) आरमोरी अरसोडा रस्ता प्रजिमा- 47 तालुका आरमोरी, 15) वेलतूर ते एकोडी रस्ता प्रजिमा,- 55 तालुका चामोर्शी, 16) वाघाळा सायगाव शिवणी रस्ता प्रजिमा 34 तालुका आरमोरी
यांसारख्या महत्त्वाच्या मार्गांवर वाहतूक ठप्प झाली आहे.
जिल्ह्यातील तालुकानिहाय पावसाची स्थिती पाहता, एटापल्ली तालुक्यात सर्वाधिक 35.5 मिमी पावसाची नोंद झाली असून, एटापल्ली मंडळात तब्बल 63.8 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्याखालोखाल चामोर्शी (30.7 मिमी), कोरची (24.4 मिमी), आणि धानोरा(12.7 मिमी) या भागातही पावसाचा जोर राहिला.
जिल्ह्याचा सरासरी पर्जन्यमान 13.2 मिमी इतका असून, 44 पैकी 42 केंद्रांमधून पावसाची मोजणी करण्यात आली आहे. सुदैवाने कोणताही “जड” किंवा “अतिजड” पाऊसगट आढळलेला नाही, मात्र काही ठिकाणी नाल्यांना पूर आल्यामुळे खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
जिल्हा प्रशासनाने नागरिकांना गैरसोयीचा सामना टाळण्यासाठी प्रवासाआधी स्थानिक प्रशासनाकडून माहिती घेण्याचं आवाहन केलं आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #crimenews # #गडचिरोली #GadchiroliRain #FloodAlert #RoadClosures #HeavyRainUpdate #Monsoon2025 #MaharashtraWeather #EtapalliRain #ChamorshiFlood #RainDisruption #StaySafe