The गडविश्व
भद्रावती, दि. २४ : तालुक्यातील ताडोबाच्या कुशीत वसलेल्या भामडेळी गावातील सामाजिक कार्यकर्ते अमोल जिवतोडे व सौ. सुषमा अमोल जिवतोडे यांनी त्यांच्या सत्यशोधक विवाह सोहळ्याच्या पाचव्या वाढदिवसा निमित्ताने सामाजिक ऋण म्हणून स्वतःच्या घरीच स्वखर्चाने वाचनालय सुरू केले. गावातील आबालवृद्धानी या वाचनालयाचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी या प्रसंगी केले आहे.
सदर वाचनालयाचे उदघाटन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्प अर्पून विलास सोयाम राऊंड ऑफिसर यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत च्या प्रथम नागरिक सौ. सुषमा जीवतोडे, सुखदेव दडमल, विकास घरत, विकास जिवतोडे, ईश्वर घोडमारे, सुधीर भोयर, सुरेश मंगाम व गावातील महिला पुरुष तसेच बालगोपाल व आदिवासी ताडोबा युवक बचत गटाचे सदस्य उपस्थित होते.
(#thegdv #thegadvishva #chandrpuenews #bhadravari #bhamdeli #Library)