The गडविश्व
गडचिरोली, २५ जुलै : जिल्ह्यातील विविध ठिकाणचे ल. पा. व मा. मा तलाव १०० टक्के भरल्याने तलावालगतच्या नागरीकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
यात चामोर्शी तालुक्यातील कुनघाडा ल. पा. तलाव, अहेरी तालुक्यातील कमलापुर ल. पा. तलाव, वडसा तालुक्यातील वडेगाव मा.मा. तलाव, विसोरा मा.मा. तलाव, चोप मा.मा. तलाव 100 टक्के भरलेले आहे. त्यामुळे तलावाच्या काठी असलेल्या व तलावाच्या सांडव्यालगत असलेल्या सर्व नागरीकांना उचित सतर्कता बाळगणे संदर्भात सावधानतेचा इशारा संबंधित विभामार्फत देण्यात आला आहे.