आई-वडिलांच्या निधनानंतर मोठ्या बहिणीच्या सहकार्याने २०२३ ला गडचिरोली पोलीस दलातील पोलीस वाहन चालक व पोलीस शिपाई या दोन्ही पदाला गवसणी घालणाऱ्या अहेरी येथील संदीप बापू गुरुनुले या लक्ष्यवेध Warrior’s ची हि यशोगाथा.
“स्वप्न सांगायचे नसतात ती सत्यात उतरवून दाखवायची असतात नाव- संदीप बापू गुरुनुले मी मूळचा अहेरी ता. अहेरी जि. गडचिरोली मी एका सर्वसाधारण कुटुंबातील असल्याने माझे प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण अहेरी येथेच पूर्ण झाले. १२ वी उत्तीर्ण झाल्यानंतर बऱ्याच लोकांनी मला डी.टी.एड करण्याचा सल्ला दिला त्यानुसार मी डी.टी.एड.ला प्रवेश घेतला व डी.टी.एड चे शिक्षण पूर्ण केले परंतु शिक्षक भरती शासनाने काही काळाकरीता बंद केल्याची मला चांगल्या प्रकारे जाणीव होती त्यामुळे नोकरी करिता मला दुसऱ्या क्षेत्राची निवड करणे गरजेचे होते. माझी ताई पोलीस असल्याने मला सुरुवातीपासूनच पोलिसांबद्दल आकर्षण होते. त्यामुळे खूप दिवस विचार केल्यानंतर मी सुद्धा पोलीस बनवण्याचा निश्चय केला. मी २०१७ साली पोलीस भरतीच्या तयारीला सुरुवात केली परंतु अंतिम यादीमध्ये मला तीन गुण कमी पडल्याने माझी निवड झाली नाही. त्यानंतर २०१८ साली परत पोलीस भरतीच्या सरावाला सुरुवात केली मेहनत तर यावेळीही भरपूर होती परंतु या भरतीमध्ये सुद्धा दोन गुणांनी मी कमी पडलो आणि मग निश्चय केला की एखादी प्रायव्हेट नोकरी करून पोलीस भरतीची तयारी करायची त्यानुसार मी ए.टी.एम.ओ या पदावर प्रायव्हेट नोकरी सुरू केली. नोकरी व पोलीस भरती असा माझ्या पुढील प्रवासाला सुरुवात झाली. पोलीस भरतीचा हा प्रवास सुरू असतानाच राजीव सरांनी अहेरी येथे लक्ष्यवेध स्पर्धा परीक्षा अकॅडमी सुरू केलेली होती तेथे मी प्रवेश घेतला. माझी ओळख प्रा. राजीव सरांशी झाली त्यांची शिकवण्याची पद्धत, मनमिळाऊ वृत्ती व विद्यार्थ्यांशी मित्रत्वाचे वागणे मला खूप आवडले आणि पोलीस भरतीचा माझा पुढील प्रवास प्रा.राजीव सरांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाला. प्रत्येक वेळी प्रत्येक प्रसंगात त्यांनी मला योग्य मार्गदर्शन केले. २०१८ नंतर पहिल्यांदाच चार वर्षानंतर २०२२ ला पोलीस भरतीची जाहिरात आली आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली परत एकदा मी भरतीत उतरलो यामध्ये मला लेखीला ९६ गुण मिळाले परंतु काही कारणाने शारीरिक चाचणीत गुण कमी मिळाल्याने माझी निवड होऊ शकली नाही यावेळीही अपयश आले परंतु खचून न जाता राजीव सरांच्या मार्गदर्शनाखाली तयारीला लागलो ते म्हणतात ना “मेहनत करने वालो की कभी हार नही होती” या म्हणी प्रमाणेच मला २०२३ च्या भरतीमध्ये माझ्या प्रयत्नाला व मी घेतलेल्या मेहनतीला यश मिळाले व माझे गडचिरोली पोलीस दलात पोलीस वाहन चालक व पोलीस शिपाई या दोन्ही पदाकरिता निवड झाली. माझ्या या यशामध्ये माझे आई-वडील आज जरी या जगात नसले तरी त्यांचे मोलाचे योगदान व मार्गदर्शन मला लाभले. त्यांच्या निधनानंतर मला आई वडिलांची कमतरता भासू न देणारी व माझ्या प्रत्येक निर्णयात खंबीरपणे माझ्या पाठीशी उभी राहणारी माझी ताई व माझ्या जिवलग मित्रांचा सुद्धा मोलाचा वाटा आहे तसेच माझे मार्गदर्शक प्रा. राजीव खोबरे सर यांचा मोलाचा वाटा आहे त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मी आज यशस्वी झालो व आज माझ्या आई वडील व कुटुंबीयांचे स्वप्न पूर्ण झाले.
– संदीप बापू गुरुनूले (निवड पोलीस वाहन चालक व पोलीस शिपाई)
मु.अहेरी त. अहेरी. जि. गडचिरोली.