– लाडक्या बहिणींनी आमदार होळी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे जिल्हा महामंत्री योगिता पिपरे यांचे आवाहन
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०२ : गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी विशेषतः महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले असून त्यांचे विधानसभेच्या विकासातील योगदान न विसरणारे आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणीनी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा महामंत्री योगिता पिपरे यांनी गडचिरोली येथील शहराच्या मेळाव्याच्या प्रसंगी उपस्थित लाडक्या बहिणींना केले.
यावेळी मंचावर आमदार डॉ. देवराव होळी, भाजपाचे ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे ,विधानसभेचे प्रमुख प्रमोद पिपरे, शहराचे अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, ज्येष्ठ नेते प्रशांत भृगुवार, महिला आघाडीचे अध्यक्ष कविता उरकुडे, ज्येष्ठ नेत्या प्रतिभा चौधरी , जिल्हा महामंत्री त्रिशा डोईजड, माजी नगरसेविका वैष्णवी नैताम, माजी नगरसेविका लता लाटकर, माजी नगरसेविका निमा उंदीरवाडे, तालुक्याच्या अध्यक्ष अर्चना बोरकुटे, पल्लवी बारापात्रे,अर्चना चन्नावार, पुनम हेमके, स्वाती चंदनखेडे यांचे सह इतर प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी बोलताना योगिता पिपरे म्हणाल्या की, आमदार डॉ. देवराव होळी यांनी गडचिरोली विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी अनेक मोठमोठी कामे खेचून आणली, जिल्हा केंद्रावरील महिलांसाठी रुग्णालय असो व वैद्यकीय शासकीय रुग्णालय कोटगल बॅरेज यासारखे अनेक मोठमोठे प्रकल्प आणून कोनसरी व सुरजागड प्रकल्पातून स्थानिकांना व महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला. त्यांनी नेहमीच महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी प्रयत्न केले असून त्यांचे काम हे जनतेमध्ये दिसून येत आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांनी लाडक्या बहिणींनी आमदार डॉ. देवराव होळी यांना विजयी करण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
याप्रसंगी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना आमदार डॉ. देवराव होळी यांनी मागील १० वर्षात आपण केलेल्या कामाची माहिती दिली. लाडक्या बहिणींनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी राहून पुन्हा भाजपाला विजयी करावे असे आवाहन करीत मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्यावर स्नेह व्यक्त केले याबद्दल उपस्थित लाडक्या बहिणींचे आभार मानले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्चना चन्नावार, संचालन पल्लवी बारापात्रे यांनी तर आभार वैष्णवी नैताम यांनी केले.