-अलोणी -बोथेडा परिसरात कृती
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०१ : तालुक्यातील अलोणी -बोथेडा परिसरात ठिकठिकाणी शोधमोहीम राबवून मोहफुलाचा सडवा, दारू व दारू गाळण्यासाठी वापरात येणारे साहित्य असा एकूण तीन लाख रुपयांचा मुद्देमाल नष्ट केल्याची कारवाई गडचिरोली पोलिस व मुक्तिपथ तालुका चमूने संयुक्तरित्या केली. याप्रकरणी एका दारू विक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अलोणी हे गाव अवैध दारूविक्रीसाठी कुप्रसिद्ध असून येथून गडचिरोली शहरासह परिसरातील काही गावातील किरकोळ विक्रेत्यांना दारूचा पुरवठा केला जातो. पोलिस विभाग व मुक्तिपथने वारंवार संयुक्त कारवाई करीत अनेक दारूविक्रेत्यांचा मुद्देमाल नष्ट करीत गुन्हा दाखल केला आहे. अशातच दारू विक्रेत्यांनी अलोणी -बोथेडा जंगलपरिसरात व शेतशिवारात ठिकठिकाणी दारू गाळण्यासाठी मोहफुलाचा सडवा टाकला असल्याची गुप्त माहिती मिळाली. प्राप्त माहितीच्या आधारे गडचिरोली पोलिस व मुक्तिपथ तालुका चमूने संयुक्तरित्या शोधमोहीम राबवून ठिकठिकाणी मिळून आलेला 36 ड्रम मोहफुलाचा सडवा, दारू गाळण्याचे साहित्य व १० लिटर दारू नष्ट केली. याप्रकरणी एका विक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई एएसआय जयप्रकाश मेश्राम , विजय नंदेश्वर पो.हवालदार, मुक्तिपथचे संघटक रेवनाथ मेश्राम यांनी केली.
(#thegdv #gadchirolinews #gadchirolipolice #muktipath )