The गडविश्व
गडचिरोली, दि. २८ : तालुक्यातील घोटविहिर, जांभळी, शिताटोला येथील शेत शिवारात गाव संघटनेच्या सहकार्याने मुक्तीपथने कृती करीत जवळ पास 3 लाख 4 हजार रुपये किंमतीचा मोहफुलाचा 33 ड्रम सडवा व 200 लिटर मोहफुलाची दारू, साखर 40 किलो व दारू काढण्याचे साहित्य नष्ट केले.
घोटविहीर, सिताटोला, जांभळी येथील दारूविक्रेत्यांच्या माध्यमातून परिसरातील १० ते १२ गावातील विक्रेत्यांना दारूचा पुरवठा केला जातो. सोबतच गावात दारू पिण्यासाठी मद्यपींची वर्दळ असते. अशातच दारूविक्रेत्यानी जंगलपरिसरात दारू गाळण्यासाठी हातभट्टी लावली असल्याची माहिती मिळाली. प्राप्त माहितीच्या आधारे गाव संघटना व गडचिरोली, धानोरा तालुका चमूने जंगलपरिसरात व शेतशिवारात शोधमोहीम राबवून दारू अड्डे उध्वस्त केले. घटनास्थळावर मिळून आलेला 3 लाख 4 हजार रुपये किंमतीचा मोहफुलाचा 33 ड्रम सडवा व 200 लिटर मोहफुलाची दारू, साखर 40 किलो व दारू काढण्याचे साहित्य नष्ट करण्यात आला.
(#thegdv #thegdavishva #gadchirolinews #muktipath)