– आरोपीच्या आवळल्या मुसक्या
The गडविश्व
वरोरा, दि. २८ : वरोरा शहर हे बाबा आमटे यांच्या आनंदवन ने प्रसिद्ध आहे. मात्र त्याच आनंदवनात तरुणीची धारधार शस्त्राने गळा चिरून हत्या केल्याची खळबळजनक घटना २६ जून रोजी घडली. सदर घटनेने वरोरा शहरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आरोपी समाधान माळी (रा. जळगाव) याच्या २४ तासात पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे.
आरती दिगंबर चंद्रवंशी ( वय २४) असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव असून ती आई – वडिलांसह आनंदवनात राहत होती. आई – वडिलांसह राहत असताना तिचे प्रेम सबंध जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील समाधान माळी या युवकासोबत जुळले. समाधान हा स्वतःचा उपचार आनंदवनात करण्यासाठी आला होता तसेच उपचार घेत तो केअर टेकरचे कामही करायचा अशी माहिती आहे. दरम्यान आरती आणि समाधान यांच्यात बीचकले आणि भांडण झाले व वाद सुरू झाले. २६ जून रोजी आरतीचे आई – वडिल हे सेवाग्राम येथे गेले असल्याचे समाधान ला कळले असता त्याने आरती चे घर गाठून तिच्याशी वाद घातला. राग अनावर झाल्याने समाधानने सोबत आणलेल्या चाकूने आरतीच्या गळ्यावर, हातावर सपासप वार करत हत्या केली व पसार झाला. आरतीचे आई – वडील रात्रोच्या सुमारास घरी पोहचले असता रक्तबंबाळ अवस्थेत आरतीच मृतदेह आढळून आले. याबाबत आनंदवनात वाऱ्यासारखी माहिती परसली. वरोरा पोलिसांना माहिती होताच घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतले व पुढील तपास सुरू केला. तपासाची चक्रे अधिक गतीने फिरवत अवघ्या २४ तासात आरोपी समाधान माळी क्या मुसक्या आवळल्या. सदर घटनेने वरोरा शहरात खळबळ उडाली असून पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #chandrpuenews #warora #anandwan warora #murder
#Jadeja #India vs. England #Narendra Modi #The Kapil Sharma Show #Brendan Fraser #All That Breathes #R Madhavan #You season 4 #India vs. Australia #Father’s Day 2024 #India vs. West Indies )