गडचिरोली जिल्ह्यात होणारी प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची तस्करी रोखली ; ३० लाख ७० हजारांचा सुगंधित तंबाखूचा साठा जप्त

316

– कारवाईने अवैध व्यावसायिकाचे धाबे दणाणले
The गडविश्व
गोंदिया, दि. ३१ : छत्तीसगड राज्यातुन गडचिरोली जिल्ह्यातील वडसा येथे जाणारा सुगंधित तंबाखूचा साठा अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करत जप्त केल्याची कारवाई गुरुवार २८ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता नवेगावबांध पोलिस ठाण्यांतर्गत ग्राम धाबेपवनी येथे करण्यात आली. या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या सुगंधित तंबाखूची किंमत तब्बल ३० लाख ७० हजार १७० रुपये असल्याचे समजते. सदर कारवाईने अवैध व्यावसायिकाचे धाबे दणाणले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तंबाखू व प्रतिबंधित पान मसाला छत्तीसगड राज्यातील रायपूर येथून एमएच ४०-सीडी ३२३५ मध्ये क्रमांकाच्या वाहनाने भरून देवरी मार्गे जंगलातून गडचिरोली जिल्ह्यातील वडसा तस्करी होत असल्याची गुप्त माहिती अन्न व औषध प्रशासनाला माहिती होताच अन्न व औषध प्रशासनाचे अन्नसुरक्षा अधिकारी महेश चहांदे, नमुना सहायक नीलकंठ बारसागडे व नवेगाव पोलिसांनी संयुक्त कारवाई करून वाहनाला धाबेपवनी येथे पकडून वाहनाची तपासणी केली असता त्यात सुगंधित तंबाखू व पान मसाला, ईगल मजा १०८ पान मसाला, रजनीगंधा असा १६०५ किलो वजनाचा साठा आढळून आला. सदर तंबाखूजन्य पदार्थाची किंमत ३० लाख ७० हजार १७० रुपये सांगितली जात असून जप्त करून वाहन चालक ओमप्रकाश देवाजी शिंदे रा. काटोल रोड, नागपूर व वाहन मालक अमित भीमराव राऊत रा. वॉर्ड क्रमांक-१ काटोल रोड, नागपूर या दोघांवर नवेगावबांध पोलिस ठाण्यात भादंवि कलम १८८, २७२, २७३, ३२८ सहकलम २६ (२) (आय), ५९ अन्न सुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here