The गडविश्व
गडचिरोली, ९ ऑगस्ट : येथील पोदार जम्बो किड्स, विदर्भ इंटरनॅशनल स्कूल मध्ये जागतिक आदिवासी दिवस साजरा उत्साहात साजरा करण्यात आला.
९ ऑगस्ट रोजी देशभरात जागतिक आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. याचेच औचित्य साधून पोदार जम्बो किड्स, विदर्भ इंटरनॅशनल स्कूल गडचिरोली येथे विद्यार्थ्यांना विविध राज्यांच्या आदिवासी समुदायाबद्दल माहिती देण्यात आली तसेच, आदिवासी बांधव डोक्यावर परिधान करतात त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी मुकुट घालून विविध आदिवासी गाण्यावर नृत्य केले. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून येत होता.