गडचिरोली : चार तालुक्याच्या सिमेवर भरणाऱ्या अवैध ‘कोंबडा बाजारा’ ला कोणाचे पाठबळ

1408

– शासकीय कर्मचाऱ्यांचीही कोंबडे बाजाराला हजेरी
The गडविश्व
गडचिरोली, दि.२४ : जिल्हयात अवैध धंदे, व्यवसायावर अंकुश लावण्याचा विळा पोलीस अधिक्षकांनी उचलला असला तरी जिल्हयात मोठया प्रमाणात अवैध कारभाराला उत येत असतांना दिसत आहे त्यामुळे पोलीस यंत्रणाही यावर अंकुश लावण्यात काही प्रमाणात कमी पडत आहेत. गडचिरोली जिल्हातील चार तालुक्याच्या सिमेवर बुधवार व रविवार ला भरणाऱ्या अवैध ‘कोंबडा बाजारा’ ला ( कोंबड्यांची झुंज लावून जुगार खेळणे ) कोणाचे पाठबळ असा सवाल उपस्थित झाला असुन या कोंबडा बाजारात चारही तालुक्यासह इतरही जिल्ह्यातील कोंबडा बाजार शौकीन व शासकीय कर्मचाऱ्यांचीही हजेरी लागत असल्याचे कळते.
गडचिरोली जिल्हयातील अवैध धंदे, व्यवसायाला आळा घालुन कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधिक्षकांनी सर्वच पोलीस स्टेशन ला दिली आहे. असे असतांना मात्र जिल्हयातील चार तालुक्याच्या सिमेवर भरण्यात येणाऱ्या अवैध कोंबडा बाजारावर चार तालुक्यातील कोणत्याच पोलीस स्टेशन, उपपोलीस स्टेशन व अधिकारी या कोणाचीच दूरदृष्टी पडली नाही का ? अवैध कोंबडा बाजाराला कोणाचे पाठबळ ? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्ह्यात सर्वत्र कोंबडा बाजारावर बंदी घालण्यात आली आहे मात्र या ठिकाणी बेधडकपणे हा बाजार भरवला जातो. हया कोंबडा बाजारावर दुरवरून कोंबडा बाजार शौकीन येत असतात असे कळते तर एवढेच नाही शासकीय कर्मचारी सुध्दा या कोंबडा बाजारावर हजेरी लावुन आपला शौक पुर्ण करत असल्याचे समजते. हा कोंबडा बाजार चारही तालुक्यातील केंद्रस्थान असल्याचे बोलल्या जात असुन मोठया प्रमाणात कोंबडा बाजारातुन महसुल गोळा करण्याचे काम काही कोंबडा बाजार कंत्राटदार करतांनाचे दिसत आहे. आपल्यावर अनेकांचा आशीर्वाद असल्याने कोणीही कार्यवाही करू शकत नाही असे तो कंत्राटदार ऐटीत सांगतो त्यामुळे त्या कोंबडा बाजारावर कोणाचीची दूरदृष्टी पडत नसेल, त्याकडे कोणीही भिरकून पाहत नसेल असा तर्कही लावण्यात येत असून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. बुधवारी व रविवारी भरणाऱ्या तो कोंबडा बाजार कोणता हे आता पोलीस यंत्रणेला शोधण्याचे मोठे आव्हान उभे आहे. पोलीस यंत्रणा त्या कोंबडा बाजाराचा शोध लावून कारवाई करणार काय याकडे लक्ष लागले आहे.
(the gdv, the gadvishva, gadchiroli news, komba bajar)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here