गडचिरोली : तोडगट्टा आंदोलनस्थळी जाण्यापासून रोखले

837

– अडीचशे दिवसांपासून आंदोलन सुरू
The गडविश्व
एट्टापल्ली-गडचिरोली, दि.२० : एटापल्ली तालुक्यातील तोडगट्टा येथे मागील अडीचशे दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला शासनाने पोलीस बळाचा वापर करून आज चिरडून टाकल्याचे प्रकरण उघडकीस आल्याची माहिती मिळताच शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव काॅ. अमोल मारकवार आणि सुरजागड पारंपरिक इलाख्याचे प्रमुख सैनू गोटा सदर आंदोलनस्थळी कारवाई नंतरही ठाण मांडून असलेल्या आंदोलकांना भेटण्यासाठी निघाले असता गट्टा – जांभीया पोलीस मदत केंद्राजवळ त्यांना अडविण्यात आल्याचे कळते.
याबाबत भाई रामदास जराते यांनी हेडरीच्या उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांशी मोबाईलवर संपर्क साधून सैनू गोटा हे या क्षेत्राचे माजी जिल्हा परिषद सदस्य आणि शिला गोटा या क्षेत्रातील माजी पंचायत समिती सदस्य असल्याने आम्हाला तोडगट्टा आंदोलनस्थळी जाण्यापासून आणि आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी अडवू नये यासंबंधात चर्चा केली. मात्र संवेदनशीलतेचे कारण देवून अडवून ठेवण्यात आले.
दरम्यान, केंद्र आणि राज्य सरकार खदान कंपन्यांच्या इशाऱ्यावरुन पोलीस बळाचा वापर करून जनतेची मुस्कटदाबी करीत आहे, असा आरोप करुन तोडगट्टाचे खदान विरोधी आंदोलन दडपशाही केल्याने संपणार नसून संपूर्ण जिल्हाभरातील मंजूर आणि प्रस्तावित लोह खदानींच्या विरोधातील आंदोलन संविधानिक पध्दतीने व्यापक स्वरूपात सुरुच राहणार असल्याचा इशारा शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव काॅ. अमोल मारकवार, सुरजागड पारंपरिक इलाख्याचे प्रमुख आणि माजी जिल्हा परिषद सदस्य सैनू गोटा, माजी पंचायत समिती सदस्य शिलाताई गोटा यांनी दिला आहे. एकूणच बघता संपूर्ण प्रकरण चिघळण्याची शक्यता असून याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ग्रामस्थांकडून ‘ही’ मागणी आणि आरोप

काही स्थानिक ग्रामस्थांनी त्यांना माओवादी आणि माओवादी आघाडीच्या संघटनेकडून निषेधासाठी बसण्यास भाग पाडले जात आहे अशी पोलिसांकडे तक्रार केली. तसेच त्यांना या भागात रस्ता आणि मोबाइल टॉवर हवे आहेत त्यानंतर गावकऱ्यांना पोलिसांकडून संरक्षण दिले जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी स्वत:हून अतिक्रमण हटविल्याची माहिती पोलिसांनी दिली. सदर घडलेल्या प्रकरणाबाबत आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्यात येत असल्याचीही माहिती पोलिसांनी दिली आहे.

(todgatta, etapalli, cg news, gadchiroli news, the gadvishva, the gdv, worldcup2023, gadchiroli police, ramdas jarate, sainu gota, amol markwar)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here