गडचिरोली : पोलीस निरीक्षकाचे चक्क न्यायाधीशाशी हुज्जत व गैरवर्तन

1761

– तडकाफडकी केले निलंबित, कार्यरत असलेल्या ठाण्यातच गुन्हाही दाखल
The गडविश्व
गडचिरोली, २५ मे : विरोधात गुन्हा नोंद करण्याचे आदेश न्यायाधीशांनी दिल्याने पोलीस निरीक्षकाने न्यायधीशाच्या निवासस्थानी जाऊन न्यायाधीशाशी हुज्जत घालून गैरवर्तन केल्याने पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी तडकाफडकी निलंबित करण्यात आले. तसेच ज्या ठाण्यात कार्यरत होते त्याच ठाण्यात गुन्हाही नोंद झाला. या कारवाईने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली असून राजेश खांडवे असे त्या पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. ते पोलीस ठाणे चामोर्शी येथे कार्यरत होते.
चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अतुल गण्यारपवार यांना निवडणुकीदरम्यान मारहाण केल्याने पोलीस निरीक्षक वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. दरम्यान पोलिस निरीक्षक राजेश खांडवे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यासह बडतर्फीच्या कारवाईसाठी चामोर्शी येथे आंदोलन झाले होते. गण्यारपवार यांनी चामोर्शी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात दाद मागितली असता प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन.डी.मेश्राम यांनी दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून २० मे रोजी पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांच्यावर विविध कलमांव्ये गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले होते. मात्र पोलीस निरीक्षक यांना ही बाब खटकल्याने गुरुवार २५ मे रोजी सकाळच्या सुमारास न्या.मेश्राम यांच्या निवस्थानी जाऊन गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिल्यावरून खांडवे यांनी न्या. मेश्राम यांच्याशी हुज्जत घालत गैरवर्तन केले. याबाबत न्या.मेश्राम यांनी पोलीस अधीक्षक निलोत्पल यांना कळवताच सदर घडलेल्या प्रकारचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने प्रकरणाची खातरजमा करत व वरिष्ठांना ही बाब कळवत तडकाफडकी निलंबित केले. व त्यानंतर चामोर्शी पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आल्याचे कळते. तर आता चामोर्शी ठाण्याचा तात्पुरता पदभार उपनिरीक्षक सुधीर साठे यांच्याकडे सोपविला असल्याचे कळते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here