गडचिरोली : लहान मुलांसाठी विशेष मेंदुविकार ओपीडी सुरू

97

– सर्च रुग्णालयात नव्या आरोग्य सुविधेचा प्रारंभ
The गडविश्व
गडचिरोली, दि. २४ : धानोरा तालुक्यातील सर्च रुग्णालयात आता लहान मुलांसाठी विशेष मेंदुविकार ओपीडी सुरू करण्यात येत आहे. या आरोग्य सुविधेमुळे न्यूरोलॉजिकल समस्या असलेल्या बालकांना वेळेवर उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सदर ओपीडी दर महिनाच्या दुसर्‍या शुक्रवारला नियोजित असून ओपीडी साठी नागपूरचे विशेषज्ञ डॉ.अमरजीत वाघ (Paediatric Neurologist) नियमित आरोग्य तपासणी साठी सर्च रुग्णालयात येणार आहेत.
सर्च मधील लहान मुलांच्या मेदुविकार ओपीडीचे अनेक फायदे आहेत. तज्ञ डॉक्टरांची उपलब्धता : मेंदूविकारांवर उपचारासाठी विशेष प्रशिक्षित तज्ञ डॉक्टर यांचे मार्फत आरोग्य तपासणी सुविधा देण्यात येत आहे. त्यामुळे निदान आणि उपचार अधिक अचूक आणि प्रभावी होणार आहेत. लवकर निदान: लहान मुलांमधील फिट्स (मिरगी) ,मेंदूचे विकासात्मक विकार, भाषा आणि भाषा विलंब, दृष्टी किंवा एकण्याच्या समस्या, संज्ञानात्मक समस्या: लक्ष, शिकणे किंवा स्मरणशक्ती मध्ये समस्या, तिव्र डोखेदुखी, वर्तणुकीत बदल व इतर यांसारख्या आजारांचे लवकर निदान होईल, ज्यामुळे योग्य उपचार सुरू करता येतील. प्रत्येकासाठी उपलब्धता: समाजातील प्रत्येकांना तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल व निर्धन रुग्णांना मोफत दरात उत्कृष्ट आरोग्य सेवा मिळणार आहे. समुपदेशन सेवा: पालकांना मुलांच्या समस्या समजावून सांगण्यासाठी समुपदेशन सुविधा देण्यात येतील. चाचण्यांची सुविधा: ईईजी, एमआरआय, सीटी स्कॅन यांसारख्या आवश्यक चाचण्याही सर्च रुग्णालयातर्फे मोफत केल्या जातात, ज्यामुळे वेळ आणि खर्चाची बचत होईल.
बालकांच्या आरोग्यासाठी लहान वयातच मेंदुविकारांवर उपचार होणे अत्यावश्यक आहे. आता लहान मुलांसाठी या खास ओपीडीमुळे मेंदुविकारांवरील उपचार सोपे व प्रभावी होणार आहेत. दर महिन्याच्या दुसर्‍या शुक्रवारला ओपीडी नियोजित असून पहिली आरोग्य तपासणी शुक्रवार १३ डिसेंबर २०२४ रोजी नियोजित आहे. उत्कृष्ट दर्जाची आरोग्य सुविधा पुरविण्याच्या उद्देशाने सर्च रुग्णालय विशेष आर्थिक सुविधा देत आहे. विशेष म्हणजे १५ वर्षाखालील सर्व लहान मुलांना सर्च रुग्णालयात कोणतेही शुल्क आकारले जात नाही. नोंदणी फी, प्रयोगशाळा तपासणी, डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधी या १००% मोफत दिल्या जातात. जास्तीत जास्त रुग्णांनी सदर ओपीडीच लाभ घ्यावा, असे आवाहन सर्च रुग्णालय करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here