निमगाव शाळेच्या पटांगणावर अर्थिंग तार पाच दिवसापासून पडलेल्या अवस्थेत

653

– संबंधित विभागाचे दुर्लक्ष
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. २३ : तालुक्यातील निमगाव येथील गणेश अलंकार विद्यालयातील शाळेच्या पटांगणावर मागील पाच दिवसापासून अर्थिंग तार पडून असतानाही याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष असल्याने वेळीच तारांची संबंधित विभागाने उचल करण्याची मागणी विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली आहे.
चातगाव विद्युत विभागाअंतर्गत येणाऱ्या निमगाव येथुन बोरी गावाला विद्युत पुरवठा करण्यात आलेला आहे. खांबावर असलेल्या विद्युत तारा सोबत अर्थिग टाकण्यात आलेल्या आहेत. सध्या या लाईनचे काम सुरू असल्याचे कळते. मात्र या लाईन ताराची जोडणी केलेली होती हे आर्थिग चे तार तुटून खांबावरून खाली पडलेले असून ते जमिनीवर पडलेले आहे. तेही गणेश अलंकार विद्यालय निमगाव शाळेच्या पटांगणावर १८ नोव्हेंबर २०२४ पासून पडून आहेत. याबाबत संबंधित लाईनमनला माहिती दिली असता हे काम आमचं नसून कंत्राटदाराचं आहे असे सांगण्यात आले. ती तार पाच दिवसानंतरही पटांगणावर पडून असून याचा त्रास शाळेतील विद्यार्थ्यांना होत आहे. तसेच विद्यार्थी पटांगणावर खेळत असताना या तारेवरुन येजा करताना दिसतात. याच तासाला लटकून पडल्याची घटना सुद्धा घडलेली आहे. ही तार संबंधित विभागाने वेळीच काढून ठेवणे गरजेचे असतानाही संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांचे पालक करीत असून पटांगणावर पडलेले तार लवकरात लवकर उचल करण्याची मागणी विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #gadchirolilocalnews #dhanora )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here