गडचिरोली पोलिसांनी माओवादी तळ केला उद्ध्वस्त

356

– मोठा शस्त्रसाठा जप्त
The गडविश्व
गडचिरोली, दि. १२ : भामरागड तालुक्यातील कवंडे पोलिस स्टेशनच्या हद्दीत महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेजवळ माओवादी तळ उद्ध्वस्त करत गडचिरोली पोलिसांनी मोठी कामगिरी बजावली आहे. माओवाद्यांच्या घातपाताच्या हालचालींची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली सी-60 च्या 200 जवानांनी काल संध्याकाळी विशेष सर्च ऑपरेशन हाती घेतले.
आज सकाळी जंगलात शोधमोहीम सुरु असताना माओवादी दहशतवाद्यांनी अचानक पोलिसांवर गोळीबार सुरु केला. सी-60 जवानांनी अत्यंत शौर्याने प्रत्युत्तर देत चकमक जवळपास दोन तास चालवली. चकमक तीन ठिकाणी झाली असून त्यानंतर परिसरात सखोल झडती घेण्यात आली.या कारवाईत पोलिसांनी एक स्वयंचलित इन्सास रायफल, एक सिंगल शॉट रायफल, एक मॅगझीन, अनेक जिवंत काडतुसे, डिटोनेटर, रेडिओ, वॉकीटॉकी चार्जर, तीन पिट्टु बॅग्ज आणि इतर नक्षलवादी साहित्य असा मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. माओवादी तळ पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आला असून काही माओवादी जखमी अथवा ठार झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांना जंगलात नेल्याचा संशय आहे.
सध्या या भागात ऑपरेशन सुरूच असून परिस्थितीवर पोलिसांचे बारकाईने लक्ष आहे. पुढील तपशील लवकरच जाहीर केला जाणार आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews #naxal )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here