-आजपासून संजय दैने यांच्याकडे जिल्हा विकासाची धुरा
The गडविश्व
गडचिरोली, दि. १४ : मावळते जिल्हाधिकारी संजय मीणा यांची बदली झाली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यामध्ये हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांची गडचिरोली चे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. आज १४ मार्च रोजी संजय दैने यांनी गडचिरोली जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला आहे.
मावळते जिल्हाधिकारी संजय मीणा हे ऑगस्ट २०२१ मध्ये गडचिरोली येथे रुजू झाले होते. आगामी लोकसभा निवडणूक आणि त्यांच्या बदलीची विविध संघटनांकडून मागणी केली जात होती. दरम्यान ११ मार्चला अचानकच त्यांच्या बदलीचे आदेश धडकले आणि तडकाफडकी त्यांची बदली करण्यात आली. आता त्यांच्या जागी हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने ची नियुक्ती करण्यात आली असून आज गुरुवार १४ मार्च रोजी त्यांनी जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला आहे.
संजय दैने हे यापूर्वी विदर्भात कामकाज केलेले आहे. चंद्रपूर येथे ते उपविभागीय अधिकारी होते. गोंदियामध्ये जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी कामकाज पाहिले आहे. तसेच ते मालेगावला महापालिका आयुक्त म्हणून होते तर दोन वर्षांपासून ते हिंगोली जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कर्तव्य बजावत होते.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolicollector #collector_sanjay_mina #collectorsanjaymina #gadchirolicollector #sanjaydaine )