– सीमावर्ती कर्जेली गावात आरोग्य कर्मचाऱ्यांची धडपड
The गडविश्व
गडचिरोली, दि. १८ : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात देशभर प्रगतीचे गोडवे गात असताना, गडचिरोली जिल्ह्यातील एक गाव अजूनही मूलभूत सुविधांच्या प्रतीक्षेत आहे. सिरोंचा तालुक्यातील झिंगानुर प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणारे कर्जेली हे गाव पावसाळ्यात तब्बल तीन महिने पूर्णतः बंदिस्त होतं – आणि तिथे पोहोचणं म्हणजे थेट जीवावरच बेतणं.
चारही बाजूंनी नाल्यांनी वेढलेलं हे गाव अजूनही पक्का रस्त्याविना आहे. पुराच्या पाण्यातून वाट काढत, चिखल-धोंड्यातून प्रवास करत झिंगानुर पीएचसीची आरोग्य टीम गावात आरोग्य सेवा पोहचवत आहे. नुकतेच VHSND लसीकरण सत्रासाठी आरोग्य सहाय्यक दब्बा, सेवक प्रताप गेडाम, सेविका मोहिनी पिपरे, गटप्रवर्तक श्रीमती जाडी आणि आशा सेविका किस्टुबाई आत्राम यांनी गावात पोहचून सेवा बजावली.
हे केवळ लसीकरण नव्हे, तर जिवाशी झुंज देणाऱ्या कर्मचाऱ्यांची राष्ट्रसेवा आहे. मागील वर्षी पुरात अडकलेल्या गरोदर महिलेला नावेद्वारे बाहेर काढून तिचा जीव वाचवणं हीही या टीमचीच कामगिरी!
प्रश्न असा आहे की, अजून किती वर्षे कर्जेली गाव रस्त्याविना, पुलाविना आणि मूलभूत सुविधांविना तडफडत राहणार? विकासाच्या गप्पा किती दिवस झिंगानुरच्या कर्मचाऱ्यांच्या पाठीवर लोटल्या जाणार?
या गावात विकासाची वाट अजूनही नदी पार करताना हरवत आहे…
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #Gadchiroli #Karjeli #ZinganurPHC #RemoteVillage #BorderAreaService #HealthcareHeroes #VHSND #GadchiroliHealthDept #AmritMahotsav #RuralDevelopment #PublicService #HealthAccess #RiverCrossingDuty #ExtremeHardshipService #Sironcha #UnsungHeroes
#गडचिरोली #कर्जेली #झिंगानुरPHC #दुर्गमगाव #सीमावर्तीसेवा #आरोग्यसेवा #VHSND #गडचिरोलीआरोग्यविभाग #अमृतमहोत्सव #गावविकास #जनसेवा #स्वास्थ्यसेवा #नदीपारसेवा #अतिदुर्गमगाव #सिरोंचा #गडविश्व #गडचिरोली #कर्जेली #झिंगानुरPHC #दुर्गमसेवा #आरोग्यविभाग #VHSND #अमृतमहोत्सव #सीमावर्तीगाव #विकासवंचित
#Gadchiroli #Karjeli #ZinganurPHC #RemoteHealthcare #BorderDuty #HealthHeroes #NoRoadsYet #FloodZoneService #VHSND #AmritMahotsav #ForgottenIndia #GroundReality #ExtremeDuty
