गडचिरोली : गामा च्या वतीने पत्रकार दिन साजरा

30

The गडविश्व
गडचिरोली, दि. ०७ : मराठी वृतपत्राचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी ६ जानेवारी ला पत्रकार दिन साजरा करण्यात येते. गडचिरोली येथील “गडचिरोली ऑल मीडिया असोसिएशन” च्या वतीने स्थानिक विश्राम गृहामध्ये आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करून पत्रकार दिन साजरा केला.
‘गडचिरोली ऑल मीडिया असोसिएशन’ हे गडचिरोलीतील डिजिटल मीडिया ( वेब न्यूज पोर्टल, युट्युब, इ. समाविष्ट ) पत्रकारांची संघटना असून या माध्यमातून विविध पत्रकार परिषदा, चालू घडामोडी अत्यंत जलद गतीने वाचकांपर्यंत पोहचविण्याचे काम करते.
पत्रकार दिन साजरा करताना ऑल मीडिया असोसिएशन चे संयोजक उदय धकाते, माजी संयोजक अनिल बोदलकर, निलेश सातपुते,
किशोर खेवले, श्रीमंत सुरपाम तिलोतमा हाजरा आदी पत्रकार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here