– राज्य पुरस्कृत योजनेत स्वातंत्र्यदिनी ग्रामपंचायतीला मिळाला जिल्हास्तरीय सर्वोकृष्ट पुरस्कार
The गडविश्व
गडचिरोली, १७ ऑगस्ट : स्वांतत्र्य दिनानिमित्त विविध ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. मात्र आरमोरी तालुक्यातील कोरेगाव ग्रामपंचायतीच्या ध्वजारोहणास आलेले ग्रामसेवक ऐन वेळी दारूच्या नशेत आपल्या कक्षेत जमीनीवर तर्र होत लोळत होते असा प्रकार घडला. याबाबत गावातली काही युवकांनी त्याचे व्हिडीओ काढून सोशल मिडीयावर व्हायरल केले तर सदर प्रकरणी ग्रामसेवकावर कारवाई करण्याची मागणीही होत आहे.
आरमोरी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या कोरेगाव ग्रामपंचायतमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहणाची तयारी झाली. ग्रामपंचायतीमध्येच मुख्य ध्वजारोहन होत असल्याने गावातील नागरीक, ग्रामपंचायत पदाधिकारी व शालेय विद्यार्थी ध्वजारोहणासाठी एकत्रीत झाले होते. येथील ग्रामसेवक यु.एम.प्रधान हे आपल्या स्वगावावरून ग्रामपंचायत मध्ये पोहचले. ग्रामसेवक आपल्या कक्षात गेले. मात्र ध्वजारोहणाची वेळ होवू लागली तरी ग्रामसेवक आपल्या कक्षाच्या बाहेर आले नाही म्हणून नागरीकांनी कक्षाकडे जावून पाहिले असता तर काय ग्रामसेवक दारूच्या नशेत जमिनीवर लोळले होते. दरम्यान यावेळी काहींनी मोबाईल मध्ये त्याचे त्या अवस्थेतील फोटो काढले. सोशल मिडीयावर त्या व्हायरल झाल्या. तर एक व्हिडीओ पाठवून झालेल्या प्रकाराची माहिती भ्रमणध्वनीव्दारे बीडीओला देण्यात आली.
विशेष म्हणजे स्वातंत्र्य दिनी याच कोरेगाव ग्रामपंचायतीला राज्य पुरस्कृत योजनेत जिल्हास्तरीय सर्वोकृष्ट मिळाला. स्वातंत्र्यदिनी ग्रामसेवकाची कृती अशोभनिय असुन याप्रकरणी तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी मागणी गावकरी यांनी केली आहे.