गडचिरोली : नवेगाव-मुरखळा येथे ट्रक चा भिषण अपघात

3765

The गडविश्व
गडचिरोली, ३० एप्रिल : जिल्हा मुख्यालयालगत असलेल्या चंद्रपूर मार्गावरील नवेगाव-मुरखळा येथे ट्रक पलटी होवून भिषण अपघात झाल्याची घटना रविवार ३० एप्रिल रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात दोघेजण ठार तर एकजण गंभीर जखमी असल्याचे कळते.
अपघात एवढा भिषण होता की गडचिरोली मार्गे चंद्रपूर कडे जात असलेला ट्रक हा अक्षरशः पलटी होवून ग्रामपंचायतच्या संरक्षण भिंतीवर पडला व ट्रक हा गडचिरोलीच्या दिशेने झाला असून या अपघात ट्रक पलटल्याने एकजण ट्रकच्या खाली दबल्याने त्याचा जागीच मृत्यू तर ट्रकमधली एकचा मृत्यू झाल्याचेही प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले. या अपघातात ग्रामपंचायत कार्यालयाची संरक्षण भिंत हि क्षतिग्रस्त झाली आहे. घटनेची माहिती पोलीसांना कळविण्यात आली असून घटनास्थळी पोलीस पथक दाखल झाले आहे. बातमी लिहेस्तव मृतक व जखमींची नावे कळू शकली नाही.
गडचिरोली-चंद्रपूर मार्गावर नेहमीच वर्दळ असते. नवेगाव मुरखळा हे मुख्य मार्गावर असल्याने या ठिकाणीही नेहमीच वर्दळ असते. या ठिकाणावरून मार्गक्रमण करत असतांना वाहनांचा वेग कमी असणे आवश्यक आहे. ©©©
बातमी अपडेट होत आहे…………

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here