The गडविश्व
गडचिरोली, दि. २५ : जिल्ह्यात दडी मारलेल्या पावसाने मागील ४- ५ दिवसांपासून मुसंडी मारली. सततधारेने तसेच गोसीखुर्द धरणाच्या विसर्गाने जिल्ह्यातील नदी, नाले फुगून दुथडी वाहत आहेत. तसेच काही नदी, नाल्यांवरून पाणी वाहत असल्याने पूरस्थिती निर्माण झाली असून मागील ४-५ दिवसांपासून अनेक मार्ग बंदच आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण विभागामार्फत मिळालेल्या माहितीनुसार खालील प्रमाणे मार्ग बंदच आहेत.

पुरामुळे बंद असलेले मार्ग ( दि.25.7.2024
वेळ सकाळी 7.30 वाजेर्यंत )
1)गडचिरोली चामोर्शी राष्ट्रीय महामार्ग शिवणी नाला ता. गडचिरोली (पर्यायी मार्ग गडचिरोली पोटेगाव कुनघाडा ते चामोर्शी )
2)आलापल्ली भामरागड रस्ता (पर्ल कोटा नदी), (कुडकेली नाला) व (चंद्रा नाला) ता. भामरागड
3)गडचिरोली आरमोरी राष्ट्रीय महामार्ग (पाल नदी) ता. गडचिरोली
4) अहेरी देवलमारी मोयाबिनपेठा रस्ता राज्यमार्ग (वट्रा नाला) (मोदुमतूरा नाला) (देवलमारी नाला)ता. अहेरी
5) लखमापूर बोरी गणपुर रस्ता प्रजिमा (हळदीमाल नाला) ता. चोमोर्शी
6) चामोर्शी फराळा मार्कडादेव रस्ता प्रजीमा ता. चामोर्शी (पर्यायी मार्ग शंकरपुर हेटी मार्कडादेव)
7) झिंगानुर कल्लेड देचलीपेठा रस्ता, प्रजिमा ता. सिरोंचा
8) मानापुर अंगारा रस्ता प्रजिमा ता. कुरखेडा
(#thegdv #gadchirolinews #gadchirolinews #floodgadchiroli )