गडचिरोली : रानटी हत्तींचा ‘कमबॅक’, मध्यरात्री नागरिकांची पळापळ

1667

– घरांची केली नासधूस,
The गडविश्व
गडचिरोली, दि. २५ : गोंदिया जिल्ह्यात गेलेल्या रानटी हत्तीने गडचिरोली जिल्ह्यात ‘कमबॅक’ करत नागरिकांची झोप उडवली आहे. २४ डिसेंबरच्या रात्री आरमोरी तालुक्यातील पाथरगोटा येथे अचानक रानटी हत्तीचा कळप दाखल झाला आणि नागरिकांची मध्यरात्री पळापळ सुरू झाली. हत्तीच्या कळपाच्या आगमनाने पाच कुटुंब घर सोडून मागच्या दाराने सैरावैरा धावली. त्यामुळे जीव तत् वाचला परंतु कुटुंब उघड्यावर आले आहे.
गडचिरोली, गोंदिया, भंडारा जिल्ह्यात रानटी हत्तींचा कळप गेल्या काही दिवसांपासून भ्रमंती करीत आहे. दरम्यान गोंदिया जिल्ह्यात गेलेल्या हत्तीच्या कळप रविवार २४ डिसेंबर च्या रात्री आरमोरी तालुक्यातील पाथरगोटा येथे दाखल झाले. गावातील नागरिक भरझोपेत असतांना अचानक आलेल्या कळपातील हत्तीने प्रथम अशोक वासुदेव राऊत यांच्या घराच्या दरवाजाला ठोक दिली. दरम्यान हत्तीची किंचाळी ऐकून घरातील सर्व सदस्य उठून घराच्या मागच्या दरवाज्याने पळून जात मोठ्याने आरडाओरड करून शेजाऱ्यांना जागे करत इतरही घरातील सर्व सदस्य जीव मठीत घेऊन घराबाहेर सुसाट धावल्याची थरारक घटना घडली. यात अशोक राऊत, सूरज दिघोरे, मंगला प्रधान, चंद्रशेखर बघमारे, दुर्गादास बघमारे यांच्या घरांचीही हत्तींनी नासधूस केली. घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली असता वनकर्मचारी घटनस्थळी दाखल होत हुल्ला पार्टीच्या मदतीने हत्तीच्या कळपाला हुसकावून लावले. या घटनेत घरांचे नुकसान झाले पण जीवितहानी टळली आहे. घरांची पडझड झाल्याने कुटुंब उघड्यावर आले असून त्या कुटुंबांना तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करुन भरपाई देण्याची मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here