गडचिरोली : दारूमुक्त निवडणूक करण्याचा उमेदवारांनी केला संकल्प

385

-मुक्तिपथच्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद
The गडविश्व
गडचिरोली, दि.१७ : गडचिरोली-चिमूर मतदारसंघातून होणारी लोकसभेची निवडणूक दारूमुक्त व्हावी, यासाठी मुक्तिपथ व गाव संघटनेच्या पुढाकारातून विविध गाव व वार्डांमध्ये ठराव पारित केले गेले. सोबतच उमेदवारांनी सुद्धा निवडणुकीत मतदारांना दारूचे आमिष देणार नाही, असा संकल्प ८ उमेदवारांनी मुक्तिपथ कडे जाहीर केला आहे.
निवडणूक काळात दारूचा गैरवापर थांबविण्यासाठी शासनातर्फे कारवाई सुरु असून जागोजागी वाहनांची तपासणी, अवैध दारू जप्त केली जात आहे. विमानाचा वैमानिक किंवा गाडीचा चालक हा दारूच्या नशेत नको. तसेच लोकशाहीचा चालक मतदार मतदान करतांना दारूच्या नशेत नको, म्हणून ही ‘निवडणूक दारूमुक्त निवडणूक’ असे आवाहन मुक्तिपथतर्फे करण्यात आले आहे. जिल्ह्यातील शहरी, ग्रामीण व दुर्गम भागात वसलेल्या विविध गावांमध्ये दारूमुक्त निवडणुकीचे महत्व पटवून दिले जात आहेत. व्हिडीओ व्हॅन, बॅनर व पत्रकातून मतदारांचे लक्ष वेधून घेतल्या जात आहे. जनतेकडूनही उत्तम सहकार्य मिळत आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी १९ एप्रिल रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. निवडून येण्यासाठी मतदारांना पैसा किंवा दारूचा लोभ दाखविण्याची शक्यता असते. यासाठी दारू पिऊन मतदान करणार नाही, दारू पिणाऱ्या उमेदवाराला मत देणार नाही तसेच दारू वाटणाऱ्याला निवडून देणार नाही, असा निर्णय जवळपास ५१३ गावांसह १११ वार्डांतील महिलांसह नागरिकांनी घेतला आहे. जनतेचे दारूबंदीला समर्थन बघता व मुक्तिपथच्या आवाहनानुसार राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी देखील दारूमुक्त निवडणुकीचा संकल्प जाहीर केला आहे. यामध्ये अशोक नेते-भाजपा, डॉ. नामदेव किरसान-कॉंग्रेस, योगेश गोन्नाडे-बहुजन समाज पार्टी, बारीकराव मडावी- बहुजन रिपब्लिकन सोशालीस्ट पार्टी, सुहास उमेश कुमरे – भीमसेना, हितेश मडावी- वंचित बहुजन आघाडी, करण सुरेश सयाम-अपक्ष, विलास कोडापे-अपक्ष, या ८ उमेदवारांनी, निवडून येण्यासाठी कोणत्याही मतदाराला दारू पाजणार नाही, वाटणार नाही असा संकल्प जाहीर केला आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #muktipath #loksabhaelection2024)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here