गडचिरोली : बंटी भांगडीयांनी नाराज उसेंडीचा पकडला हात , उसेंडी चा ‘पंजा’ ला रामराम

1732

-काँग्रेसला मोठा धक्का, अखेर उसेंडीचा भाजपात प्रवेश
The गडविश्व
गडचिरोली, दि. २६ : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतांना गडचिरोलीत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत अखेर आज भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला आहे.
लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आणि कॉंग्रेसकडून गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राच्या उमेदवारी करिता माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी हे इच्छुक होते. मात्र डॉ.नामदेव किरसान यांना उमेदवारी जाहिर झाल्याने उसेंडी यांनी पक्षावर नाराजी व्यक्त करीत आज २६ मार्च ला दुपारी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. आपण या क्षेत्रासाठी इच्छुक असून, स्थानिक उमेदवार म्हणून आपल्याला उमेदवारी मिळेल अशी आशा होती मात्र तसे न होत सुळबुद्धीने आपल्याला डावलण्यात आले असा आरोप उसेंडी यांनी पत्रकार परिषदेत केला. त्यानंतर चिमूर विधानसभा क्षेत्राचे भाजपचे आमदार बंटी भांगडीया हे उसेंडी च्या भेटीला आले. दोघांमध्ये बंद दरवाजा आड काही काळ चर्चा झाली व भांगडीया यांनी उसेंडी यांची मनधरणी करून उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी भेट घडवून आणली. दरम्यान उसेंडी हे भाजपवासी होणार अश्या चर्चांना उधाण आले होते. मात्र काही तासातच उसेंडी यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. उसेंडी यांच्या भाजप प्रवेश काँग्रेसला मोठा धक्का मानल्या जातात असून एकूणच घडामोड बघता भांगडीया यांनी उसेंडी यांचा पकडलेला हात आणि उसेंडी यांनी ‘पंजा’ केलेला रामराम यातून दिसून येत आहे.

(#thegdv #thegadvishva #thegadvishva #drusendi #congress #bjp #drnamdeousendi )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here